जळगावात आषाढच्या पहिल्यास दिवशी पावसाची दमदार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 21:41 IST2018-07-14T21:37:51+5:302018-07-14T21:41:54+5:30

गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या दमदार पावसाचे आषाढ मासाच्या पहिल्याच दिवशी शनिवारी संध्याकाळी जोरदार आगमन झाल्याने बळीराजासह सर्वांनाच दिलासा मिळाला आहे.

Heavy rain in the first day of rain in Jalgaon | जळगावात आषाढच्या पहिल्यास दिवशी पावसाची दमदार हजेरी

जळगावात आषाढच्या पहिल्यास दिवशी पावसाची दमदार हजेरी

ठळक मुद्देजळगावात पावसामुळे ठिकठिकाणी साचले पाणीतब्बल २२ दिवसानंतर झाला दमदार पाऊससकाळपासून अधूम-मधून पावसाची हजेरी

जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या दमदार पावसाचे आषाढ मासाच्या पहिल्याच दिवशी शनिवारी संध्याकाळी जोरदार आगमन झाल्याने बळीराजासह सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. तब्बल २२ दिवसानंतर झालेल्या दमदार पावसाने शहराला संध्याकाळी अक्षरश: झोडपून काढले. या पावसामुळे शहरातील विविध भागात पाण्याचे तळे साचल्याने वाहनधारकांसह पादचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागला.
यंदा मान्सूनपूर्वीच २ जून रोजी शहरात दमदार पाऊस झाला होता. ७ जून पूर्वीच आलेल्या या दमदार पावसाने सर्वांच्या आशा पल्लवीत होऊन यंदा चांगला पावसाळा चांगला राहणार असण्याचा अंदाज वर्तविला जात होता. मात्र मध्येच पावसाने दडी मारल्याने सर्वच चिंतातूर झाले. त्यात पेरणी तर झाली मात्र २२ जूनपासून जोरदार पाऊसच नसल्याने सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या.
गेल्या आठवड्यातही आभाळ दाटून आले तरी पाऊस हुलकावणी देत होता. शनिवारीदेखील सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यानंतर अधून-मधून रिपरिप होत होती. दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास जोरदार पावसाला सुरूवात झाली. मात्र अर्धा तास पडल्यानंतर तो पुन्हा गायब झाला. संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात होऊन तब्बल तासभर तो सुरूच राहिला. त्यानंतर त्याचा वेग कमी झाला तरी रात्रीपर्यंत पाऊस सुरूच होता. यात अधून-मधून जोरदार सरी कोसळत होत्या.

Web Title: Heavy rain in the first day of rain in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.