शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

गारपीट व वादळामुळे रब्बीचे पिकाचे प्रचंड नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 13:14 IST

‘कोरोना’ नंतर आता निसर्गाचाही कहर, गहू, हरभऱ्याला फटका

जळगाव : शहरासह तालुक्यातील भोकर, आव्हाणे, ममुराबाद, कानळदा, गाढोदा, किनोद गिरणा व तापी काठच्या गावांमध्ये रात्री ८ वाजेच्या सुमारास वादळी पाऊस व गारपीटी झाली. त्यात गहू, हरभºयासह केळीचेही प्रचंड नुकसान झाले आहे. सूमारेतासभर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे शेतकºयाचे कंबरडे मोडले गेले आहे. आधीच ‘कोरोना’मुळे शेतीचे व्यवहार ठप्प असताना आता निसर्गानेही आपले रौद्ररुप दाखविल्याने शेतकºयांचा चिंता वाढल्या आहेत.जळगाव शहरात पावसाचे प्रमाण कमी असले तरी तालुक्यातील गाढोदा, पळसोद भोकर, कठोरा, किनोद , आव्हाणे या भागात जोरदार वाºयासह झालेल्या पाऊस व गारपीटीने चांगलाच हाहाकार माजवला. म्हसावद, वडली, जळके या भागात वादळ होते. ऐन काढणीवर असलेल्या गहू व हरभºयाचा पिकाला सर्वाधिक फटका बसला आहे.भोकर भागात अर्धातात गारपीटतहसिलदार वैशाली हिंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार भोकर पट्टयात मोठे नुकसान झाले असून, या भागात अर्धातास गारपीट झाली आहे. रात्री उशीरापर्यंत नुकसानीचा आढावा घेतला जात होता.ममुराबादला घरांवरील पत्रे उडालेममुराबाद : परिसरात मंगळवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास वादळी वाºयासह पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला. रब्बी हंगामातील काढणीवर आलेल्या गहू, दादर ज्वारी पिकांचे त्यामुळे मोठे नुकसान झाले असून वादळामुळे काही घरांवरील पत्रेही उडाली आहेत.दिवसभर कडक ऊन व उकाड्याची स्थिती असतांना सायंकाळनंतर वातावरणात अचानक मोठा बदल झाला. वाºयाचा वेग वाढून ढगाळ वातावरणाची निर्मिती झाल्यावर रात्री उशिरापर्यंत विजांच्या कडकडाट व पाऊस सुरू होता. साधारण पाच मिनिटे बोरांच्या आकाराची गार पडली. रस्त्यांवर तसेच घरांच्या अंगणात अक्षरश: गारांचा सडा पडल्याचे दिसून आले. दरम्यान, शेतात उभ्या असलेल्या रब्बी पिकांचे गारपिटीमुळे काय हाल झाले असतील, या कल्पनेनेच शेतकºयांच्या अंगावर काटा उभा राहिला आहे. वादळामुळे दत्त मंदिराजवळील श्रीराम यादव यांच्या घरावरील पत्रेही उडाली.गारपीटीमुळे शेकडो हेक्टरवरील गहू झाला आडवा२५ ते ३० किमी प्रतीतास वेगाने वाहणाºया वाºयामुळे केळीच्या पिकाला मोठा फटका बसला असून, गाढोदा ते आव्हाणे या केळी पट्टयात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, हजारो हेक्टरवरील केळीला फटका बसला आहे. यासह पावसासह झालेल्या गारपीटीमुळे शेकडो हेक्टरवरील गहू व हरभºयाचे पिक अक्षरश आडवे झाले होते. प्रशासनाने तत्काळ नुकसानीचा आढावा घेवून शेतकºयांना मदत करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव