शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीत मने जुळली नव्हती..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 17:26 IST

- एकनाथराव खडसे, माजी मंत्री

महाविकास आघाडीत मने जुळली नव्हती..महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला बहुमत दिले होते व सर्वसामान्यांची इच्छा देखील महायुतीचे सरकार यावे हीच होती.दुर्दैवाने सेनेने माघार घेतल्याने समीकरण बदलले. युतीचे सरकार यावे आणि स्थिर सरकार यावे अशी आपली अपेक्षा आहे. मात्र मधल्या कालखंडात सेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस अशा विभिन्न विचारांच्या तडजोडी सुरू झाल्या. त्यामुळे हे सरकार टीकेल की नाही ही शंकाच होती.हे स्थिर सरकार बनवण्याच्या दृष्टिकोनातून उचललेले पाऊल असून राजकारणातील एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. स्थिर सरकार येईल व दिलेली वचने देखील पूर्ण होतील. यासाठी मात्र वाट बघावी लागेल. शिवसेनेने स्वत:हून ओढवून घेतलेली ही परिस्थिती असून, महा विकास आघाडी करताना मने जोडलेली नाहीत.केवळ भाजपाचे सरकार नको म्हणून सर्वांनी एकत्र येऊन कोणालाही विश्वासात न घेता उचललेले हे पाऊल आहे.अजित पवार यांनी हे पाऊल उचलले याच्या मागील अर्थ हाच असावा की मने जुळली नव्हती. मनाने, तत्वाने व विचाराने एकत्र न आल्याने सेना काँग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार बनू शकले नाही. तत्व बाजूला ठेवून अशा गोष्टी घडत असतील तर राजकारणातील हे अनाकलनीय असे दुर्दैव आहे, अशी भूमिका माजी आमदार, माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केली.