शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रावेरमधील सन १९९९ च्या बारावीच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 16:46 IST

रावेर येथील सरदार जी.जी.हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामधील सन १९९९ मध्ये बारावीत शिकत असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.

ठळक मुद्देपरदेशातील ६३ वर्गमित्रांचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा सहभागउपस्थित वर्गमित्रांकडून जीवनाची वाटचाल स्पष्ट करत, सुख-दु:खाचे केले अनुभव कथनवर्गशिक्षक व तज्ज्ञ विषय शिक्षकांच्या लक्षणीय अध्यापन कौशल्यांना दिला उजाळा

रावेर, जि.जळगाव : येथील सरदार जी.जी.हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामधील सन १९९९ मध्ये बारावीत शिकत असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. विशेषत: त्या शैक्षणिक वर्षातील परदेशात नोकरीवर असलेल्या ६३ वर्गमित्रांनी मात्र व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा सहभाग नोंदवल्याने आॅनलाइन शालेय आठवणींना उजाळा देण्याचा आनंद मिळाला आहे.सरदार जी.जी. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील सन १९९९ च्या इयत्ता बारावीच्या तुकडीतील विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात झाले. संयोजक राकेश नेमाडे, चैतन्य महाजन, पारस अग्रवाल व किरण महाजन यांनी उपस्थित वर्गमित्रांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वर्गमित्रांमधील माजी विद्यार्थी तथा शहरातील प्रतिथयश ह्रदयरोगतज्ज्ञ डॉ.योगेश पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप लासूरकर, माध्यमिक शिक्षक हितेंद्र सावकारे, पी.के.पाटील, कनिष्ठ लिपिक नरेंद्र माळी, धनराज महाजन, विशाल वाणी, भू-तंत्रज्ञ कुंदन चौधरी, अभियंता संदीप महाजन, औषध निर्माता ललित धांडे, शशिकांत पाटील, कैलास महाजन, देवेंद्र बारी, नगरसेवक यशवंत दलाल, रवींद्र चौधरी, पत्रकार मोरेश्वर सुरवाडे, हरीष जगताप, कमलाकर चौधरी आणि सर्व मित्र परिवार उपस्थित होते.याप्रसंगी उपस्थित वर्गमित्रांनी आपला परिचय सादर करून शैक्षणिक व व्यावसायिक जीवनाची वाटचाल स्पष्ट करत जीवनातील सुख दु:खाचे अनुभव कथन केले. अनेकांनी बालपणीच्या मैत्रीलाही उजाळा दिला. आपल्या वर्गशिक्षक व तज्ज्ञ विषय शिक्षकांच्या लक्षणीय अध्यापन कौशल्यांना उजाळा देत कविता, देशभक्तीपर गीत, युगलगीत, सिनेगीत, सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून आजही बारावीतील धडकत्या युवास्पंदनांच्या अनुभूतीची जाणीव करून दिली.सूत्रसंचालन भाऊलाल चौधरी, चैतन्य महाजन व नीलेश जोशी यांनी केले. हृदयरोगतज्ज्ञ डॉ.योगेश पाटील व डॉ.प्रदीप लासूरकर यांनी वैद्यकीय सेवेतील मानवसेवेतून मरणासन्न रूग्णांना जीवन जगण्याचे बळ देवून असाध्य यश प्राप्त केल्याचे अनुभव कथन केल्याने वर्गमित्रांनी सार्थ अभिमान व्यक्त केला. सर्व वर्गमित्रांनी उशिरापर्यंत मनोरंजन करून स्नेहसंमेलन यापुढेही घेणार असल्याचे सर्वानुुमते ठरविण्यात आले. 

टॅग्स :SchoolशाळाRaverरावेर