रावेरमधील सन १९९९ च्या बारावीच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 04:45 PM2018-11-12T16:45:07+5:302018-11-12T16:46:17+5:30

रावेर येथील सरदार जी.जी.हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामधील सन १९९९ मध्ये बारावीत शिकत असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.

Harmony of H. 12th Century students in Raver year 1999 | रावेरमधील सन १९९९ च्या बारावीच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

रावेरमधील सन १९९९ च्या बारावीच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

googlenewsNext
ठळक मुद्देपरदेशातील ६३ वर्गमित्रांचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा सहभागउपस्थित वर्गमित्रांकडून जीवनाची वाटचाल स्पष्ट करत, सुख-दु:खाचे केले अनुभव कथनवर्गशिक्षक व तज्ज्ञ विषय शिक्षकांच्या लक्षणीय अध्यापन कौशल्यांना दिला उजाळा

रावेर, जि.जळगाव : येथील सरदार जी.जी.हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामधील सन १९९९ मध्ये बारावीत शिकत असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. विशेषत: त्या शैक्षणिक वर्षातील परदेशात नोकरीवर असलेल्या ६३ वर्गमित्रांनी मात्र व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा सहभाग नोंदवल्याने आॅनलाइन शालेय आठवणींना उजाळा देण्याचा आनंद मिळाला आहे.
सरदार जी.जी. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील सन १९९९ च्या इयत्ता बारावीच्या तुकडीतील विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात झाले. संयोजक राकेश नेमाडे, चैतन्य महाजन, पारस अग्रवाल व किरण महाजन यांनी उपस्थित वर्गमित्रांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वर्गमित्रांमधील माजी विद्यार्थी तथा शहरातील प्रतिथयश ह्रदयरोगतज्ज्ञ डॉ.योगेश पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप लासूरकर, माध्यमिक शिक्षक हितेंद्र सावकारे, पी.के.पाटील, कनिष्ठ लिपिक नरेंद्र माळी, धनराज महाजन, विशाल वाणी, भू-तंत्रज्ञ कुंदन चौधरी, अभियंता संदीप महाजन, औषध निर्माता ललित धांडे, शशिकांत पाटील, कैलास महाजन, देवेंद्र बारी, नगरसेवक यशवंत दलाल, रवींद्र चौधरी, पत्रकार मोरेश्वर सुरवाडे, हरीष जगताप, कमलाकर चौधरी आणि सर्व मित्र परिवार उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित वर्गमित्रांनी आपला परिचय सादर करून शैक्षणिक व व्यावसायिक जीवनाची वाटचाल स्पष्ट करत जीवनातील सुख दु:खाचे अनुभव कथन केले. अनेकांनी बालपणीच्या मैत्रीलाही उजाळा दिला. आपल्या वर्गशिक्षक व तज्ज्ञ विषय शिक्षकांच्या लक्षणीय अध्यापन कौशल्यांना उजाळा देत कविता, देशभक्तीपर गीत, युगलगीत, सिनेगीत, सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून आजही बारावीतील धडकत्या युवास्पंदनांच्या अनुभूतीची जाणीव करून दिली.
सूत्रसंचालन भाऊलाल चौधरी, चैतन्य महाजन व नीलेश जोशी यांनी केले. हृदयरोगतज्ज्ञ डॉ.योगेश पाटील व डॉ.प्रदीप लासूरकर यांनी वैद्यकीय सेवेतील मानवसेवेतून मरणासन्न रूग्णांना जीवन जगण्याचे बळ देवून असाध्य यश प्राप्त केल्याचे अनुभव कथन केल्याने वर्गमित्रांनी सार्थ अभिमान व्यक्त केला. सर्व वर्गमित्रांनी उशिरापर्यंत मनोरंजन करून स्नेहसंमेलन यापुढेही घेणार असल्याचे सर्वानुुमते ठरविण्यात आले.





 

Web Title: Harmony of H. 12th Century students in Raver year 1999

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.