सुधर्माने वाढविला दिवाळीचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 22:21 IST2019-11-04T22:21:15+5:302019-11-04T22:21:47+5:30

जळगाव : सुधर्मा ज्ञानसभा या सामाजिक संस्थेने दरवर्षीप्रमाणे आपली सामाजिक बांधिलकी जपत यावर्षीदेखील २० गरीब विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना ५०० रुपयांच्या ...

Happy Diwali Enhanced Diwali | सुधर्माने वाढविला दिवाळीचा आनंद

सुधर्माने वाढविला दिवाळीचा आनंद


जळगाव : सुधर्मा ज्ञानसभा या सामाजिक संस्थेने दरवर्षीप्रमाणे आपली सामाजिक बांधिलकी जपत यावर्षीदेखील २० गरीब विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना ५०० रुपयांच्या जीवनावश्यक किराणा साहित्याचे वाटप केले.
वंचित मुलांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी स्वत: जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे उपस्थित होते. यावेळी सावखेडा बु येथील तेजस्विनी कैलास वानखेडे, मनिषा आबा मोरे, प्रियांका हिरालाल पवार, कशिरा सोनवणे, राहुल सोनवणे, राजीव गांधीनगर येथील पवन विनोद आगले, साहिल सुनील आचार्य, प्रतिक्षा संजय सकट, तृप्ती सोमनाथ लोंढे, शुभम लक्ष्मण हातागळे, खेडी खुर्द गायत्री रतन पाटील, विशाल तेजराव राठोड, गायत्री रविंद्र महाजन, चेतन ज्ञानेश्वर पाटील, मन्यारखेडा येथील वैशाली पाटील, पल्लवी बोदडे, समतानगर येथील तुषार रामचंद्र तायडे, पवन सपकाळे, नशिराबाद येथील देवेंद्र राजेश बेलसरे, अजहर सय्यद मोमीन या मुलांना मदत देण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिनकर बाविस्कर, राजेंद्र चौधरी, भुवनेश्वर चव्हाण यांच्यासह सुधर्मा ज्ञानसभा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Happy Diwali Enhanced Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.