शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

माहेश्वरी समाजातील सहा जोडप्यांचे शुभमंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 4:31 PM

सामुहिक विवाह सोहळा : पाच हजारपेक्षा अधिक समाज बांधवांची उपस्थिती

जळगाव- जळगाव जिल्हा माहेश्वरी विवाह सहयोग समिती, जळगाव जिल्हा माहेश्वरी सभा आणि पाळधी येथील श्री साई सेवा समिती चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने आयोजित सातवा सामुहिक विवाह सोहळा गुरूवारी मणियार मैदानावर पार पडला. यामध्ये माहेश्वरी समाजातील ६ जोडप्यांचे शुभमंगल होवून त्यांच्या वैवाहिक जीवनाला सुरूवात झाली.वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर हा विवाह सोहळा झाला. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून माहेश्वरी महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्यामसुंदर सोनी, राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक बंग, आमदार सुरेश भोळे, प्रदेश संघटनमंत्री प्रा.संजय दहाड, प्रदेश उपाध्यक्ष मनिष झंवर, प्रदेश सहमंत्री अ‍ॅड़ राजेंद्र माहेश्वरी, प्रदेश संयुक्तमंत्री विठ्ठलदास आसावा, प्रदेश जनसंपर्क मंत्री मनिष मणियार, प्रताप पाटील, देवकिनंदन झंवर आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक प्रदेश संघटनमंत्री प्रा़ संजय दहाड यांनी केली. त्यानंतर श्यामसुंदर सोनी मार्गदर्शन करीत कमी खर्चात उत्कृष्ठ नियोजन केल्याबद्दल समितींचे कौतूक केले. दरम्यान, कार्यक्रमाला तब्बल ५ हजार पेक्षाअधिक समाज बांधवांची उपस्थिती होती़ कार्यक्रमाच्या शेवटी आभार जगदीश जाखेटे यांनी मानले़ तर सुत्रसंचालन वैष्णवी झंवर, निधी भट्टड, राधिका जाखेटे, रमण लाहोटी यांनी केले. विशेष म्हणजे, निमंत्रण पत्रिका सोशल मीडियाच्या माध्यमाद्वारे पाठवून कागदाची बचत करून पर्यावरण रक्षणाचा माहेश्वरी समाजाकडून देण्यात आला. त्याचबरोबर नव दाम्पत्यांना संसारपयोगी साहित्य व नवीन कपडे भेट देण्यात आली.यांनी घेतले परिश्रमकार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाळकृष्ण बेहेडे, शामसुंदर झंवर, सुरजमल सोमाणी, सुभाष जाखेटे, प्रमोद झंवर, विवेकानंद सोनी, डॉ.जगदीश लढ्ढा, वासुदेव बेहेडे, दीपक लढ्ढा, माणकचंद झंवर, शरद कासट, नितीन लढ्ढा, शाम कोगटा, संजय बिर्ला, गिरीश झंवर, तेजस देपुरा, विनोद मुंदडा, प्रदीप मणियार, सुनील कासट, नारायण सोमाणी, हर्षल जाखेटे, कैलास लाठी, नितीन देपुरा, शिवनारायण तोष्णीवाल, नरेंद्रकाबरा, बी.जे.लाठी, रमण लाहोटी, राधेश्याम बजाज, तुषार तोतला, अमित बेहेडे, अभिजित झंवर, राहुल झंवर, कैलास मुंदडा, अशोक लढ्ढा, निखिल झंवर, पंकज कासट, अजय दहाड, लोकेश राठी, अभय बियाणी, दीपक कासट, गोविंदा लाठी, चेतन दहाड, आशिष समदाणी, महेश मंडोरा, नंदकिशोर लाठी, संजय चितलांगे, विजय मुंदडा, योगेश कलंत्री, विलास काबरा, राहुल लढ्ढा, मधुर झंवर, आशिष कासट, घनशाम कालाणी तसेच माहेश्वरी समाजाच्या सर्व संघटना, संस्था, सर्व महिला संघटन व सर्व समाज बांधवानी परिश्रम घेतले.

 

 

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalgaonजळगाव