राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना खडसेंच्या निवडणूकपूर्व शुभेच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 11:22 AM2019-03-13T11:22:57+5:302019-03-13T11:23:49+5:30

नवीन मंदिरावर वाढदिवसाच्या औचित्याने घेतली सदिच्छा भेट

Happy anniversary of Khadse to NCP's District President | राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना खडसेंच्या निवडणूकपूर्व शुभेच्छा

राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना खडसेंच्या निवडणूकपूर्व शुभेच्छा

Next


मुक्ताईनगर : आमदार एकनाथराव खडसे यांची पक्षांतर्गत होणारी मुस्कटदाबी. रावेर लोकसभा मतदार संघातून भाजपा उमेदवाराबाबत अनिश्चितता आणि उद्विग्न खडसे यांनी मुख्यमंत्रीपद व अंबानी बंगल्याचा ऐन निवडणुकीच्या तोंडावर विषय काढल्या नंतर मंगळवारी दुपारी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील यांची संत मुक्ताबाई नवीन मंदिरावर वाढदिवसाच्या औचित्याने सदिच्छा भेट घेतली.
भेट जरी सदिच्छा असली तरी लोकसभा निवडणुकीतील संभाव्य भूमिकेबाबत या भेटीला राजकीय कंगोरे आहेत.
एरवी श्री क्षेत्र कोथळी मुक्ताई मंदिरावर आता अध्यात्मिक कार्यक्रमात आमदार एकनाथराव खडसे व अ‍ॅड. रवींद्र पाटील यांची भेट होत असते.
परंतु मंगळवारी स्वत: खडसे यांनी मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई नवीन मंदिरावर जावून रवींद्र पाटील यांची भेट घेतली हे विशेष. या वेळी बेटी बचाओ बेटी पढाओचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके, माजी जि.प. अध्यक्ष अशोक कांडेलकर, बाजार समितीचे सभापती निवृत्ती पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष दशरथ कांडेलकर, सरचिटणीस बी. सी. महाजन, सतीश चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष यु.डी. पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख ईश्वर रहाणे, माजी सभापती आनंदराव देशमुख उपस्थित होते.
४एरवी पक्ष निरीक्षकाची भूमिका बजावणारे डॉ. राजेंद्र फडके यांनी अ‍ॅड.रवींद्र पाटील यांना शहरातील मुख्य चौकात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. नंतर परत ते रवींद्र पाटील व खडसे यांच्या भेटी पूर्वी नवे मुक्ताई मंदिर येथे पोहोचले होते ही बाब लक्षवेधी ठरली.

Web Title: Happy anniversary of Khadse to NCP's District President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.