वन्यप्राण्यांचा हडसण येथे हैदोस, पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:18 IST2021-07-31T04:18:32+5:302021-07-31T04:18:32+5:30
कुरंगी, ता. पाचोरा : शेती पिकांवर वन्यप्राण्यांनी हैदोस घातला आहे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून ...

वन्यप्राण्यांचा हडसण येथे हैदोस, पिकांचे नुकसान
कुरंगी, ता. पाचोरा : शेती पिकांवर वन्यप्राण्यांनी हैदोस घातला आहे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी त्रस्त झाले असताना वनविभाग दखल घेत नसल्याची शेतकऱ्यांची व्यथा आहे.
हडसण, ता. पाचोरा येथील शेतकरी रामचंद्र रूपसिंग पाटील यांच्या मालकीच्या शेतात गट नंबर ६५/१ या २ हेक्टर क्षेत्रावर पाच थैली मका बियाणे लागवड केली आहे. वनविभागाला लागून असलेल्या हडसण शिवारात नेहमीच वन्यप्राणी मुक्तसंचार करीत असल्याने रब्बी हंगामात, उन्हाळी व खरिपात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर पिकांच्या नुकसानीला सामोरे जावे लागते.
खरीप हंगामात शेतकरी मोठ्या प्रमाणावर मका पिकाची लागवड करतात. वन्यप्राण्यांकडून नुकसान होऊ नये म्हणून मी २८ मे रोजी लवकर लागवड केली होती. तरी पण माझे मोठे नुकसान झाले आहे. अजूनही वनविभागाने हजेरी लावली नाही. या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करीत नसल्याने मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते.
-रामचंद्र रूपसिंग पाटील, शेतकरी, हडसण, ता. पाचोरा