गुटखा प्रकरणात मालकावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 20:45 IST2020-07-14T20:45:42+5:302020-07-14T20:45:51+5:30
जळगाव : एमआयडीसीतील जी सेक्टरमध्ये पोलिसांनी पकडलेल्या गुटखासाठा प्रकरणात मंगळवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात विजय अश्रफीलाल मिश्रा (३४, रा.शाहू नगर) ...

गुटखा प्रकरणात मालकावर गुन्हा दाखल
जळगाव : एमआयडीसीतील जी सेक्टरमध्ये पोलिसांनी पकडलेल्या गुटखासाठा प्रकरणात मंगळवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात विजय अश्रफीलाल मिश्रा (३४, रा.शाहू नगर) याच्याविरुध्द अन्न सुरक्षा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पंढरीनाथा पाटील (४६, रा. यशवंत कॉलनी) यांनीच फिर्याद दिली आहे.
गुटख्याच्या गोदामावर सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन व स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम यांच्या पथकाने सोमवारी रात्री ८ वाजता छापा टाकला होता. त्यात १३ लाख ६८ हजार १२० रुपये किमतीचा पानमसाला व गुटखा जप्त करण्यात आला होता. या साठ्यातील गुटख्याचे नमुने घेण्यात आलेले असून ते तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, हा गुटखा कुठून आणला, यामागे आणखी कोण आहे याचा तपास पोलिसांनी करावा असेही फिर्यादीत म्हटले आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे करीत आहेत.