शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
देशातील मुस्लिमांना दाबले जाते, म्हणून पहलगाम हल्ला झाला; रॉबर्ड वाड्रांचे धक्कादायक वक्तव्य
5
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
6
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
7
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
9
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
10
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
11
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
15
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
16
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
17
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
18
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
19
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
20
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!

'इस देश मे रहना होगा, तो वंदे मातरम कहना होगा', गुलाबरावांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2022 12:37 IST

त्यासंदर्भात गुलाबराव पाटील यांनीही सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच, इस देश मे रहना होगा, तो वंदे मातरम कहना होगा... असेही ते म्हणाले. 

जळगाव - राज्य सरकारनेसरकारी कर्मचाऱ्यांना फोनवरुन बोलताना हॅलो ऐवजी सक्तीने वंदे मातरम म्हणण्याचे बजावले आहे. महाराष्ट्रामध्ये अमृत महोत्सवी वर्षाचा मुहूर्त साधून २ ऑक्टोबरपासून याची सुरुवात होत आहे.  वंदेमातरम म्हटल्यावर इंग्रज रागवायचे, दंड करायचे. महाराष्ट्रात यापुढे फोनवर असो की एकत्र येऊन बोलताना हॅलो ऐवजी, वंदे मातरमने संवादाची सुरुवात करावी, यासाठी महाराष्ट्र सरकारने जीआर काढला आहे, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. या निर्णायावरुन वाद होताना दिसत आहे. त्यासंदर्भात गुलाबराव पाटील यांनीही सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच, इस देश मे रहना होगा, तो वंदे मातरम कहना होगा... असेही ते म्हणाले. 

भुसावळ तालुक्यातील कोठारा, कोठारा बुद्रुक, फुलगाव, व कंडारी येथील पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. भुसावळ तालुक्यातील या चार गावांच्या 13 कोटी रुपये पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन झाले. त्यानंतर, पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधत होते. 

ज्या मातीमध्ये तुम्ही राहता त्या मातीला नमन करणे म्हणजे वंदे मातरम होय. इस देश मे रहना होगा, तो वंदे मातरम कहना होगा, असे म्हणत राज्य सरकारच्या वंदे मातरम सक्तीच्या निर्णयाचं पाटील यांनी स्वागत केलं. वंदे मातरम म्हणणं काही चुकीचं नाही, चंद्रकांत खैरे स्वतः निवडून आले नाहीत, त्यांना एम आय एम ने पाडलं, तू सुधार म्हणावं बाबा, अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिले आहे. 

या महाराष्ट्रामध्ये अमृत महोत्सवी वर्षाचा मुहूर्त साधून २ ऑक्टोबरपासून याची सुरुवात होत आहे. आनंदमठमध्ये हे गीत लिहीताना जन गन मन हे राष्ट्र गीत आणि वंदे मातरमला मान्यता देण्यात आली. इंग्रजांना हे गीत त्रास देणारे वाटायचे. हे शब्द आम्हाला प्राण प्रिय आहेत, असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. संभाषणाची सुरुवात हॅलोने झाली. ती वंदे मातरमने व्हावी, मग ती मोबाईलवर असो की दोघांमधील चर्चा, असा आमचा प्रयत्न असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. तसेच हे अभियान आहे, सक्ती नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

महाराष्ट्रातील १७ हजार गावांची योचजना मंजूर

महाराष्ट्रातील जवळपास १७,००० गाव आहेत त्या गावातील पाणीपुरवठा योजनेच्या बीपीआर मंजूर करून त्यांना मंजुरी देण्यात आल्याचे सांगितले. तसेच, २०२४ पर्यंत महाराष्ट्रातील एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही हे धोरण ठरलेला आहे, त्या धोरणाप्रमाणे पहिला टप्पा आता पूर्णत्वास येत आहे, असेही ते म्हणाले.

वंदे मातरमची सक्ती योग्य नाही

'कर्मचाऱ्यांनी फोन कॉलला उत्तर देताना हॅलो ऐवजी 'वंदे मातरम्' म्हणावे असे आदेश महाराष्ट्र राज्य सरकारने जारी केले आहेत.'वंदे मातरम्' भारतीयांमध्ये अभिमानाची व देशभक्तीची भावना जागृत करते. मात्र सक्तीने असे म्हणण्यास भाग पाडणे योग्य नाही, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो म्हणाले. कर्मचारी त्यांचे खासगी फोन वापरत असतानाही वंदे मातरम् म्हणण्यास सांगितले जात आहे. हे त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्कांचे उल्लंघन आहे. लोकांवर विशिष्ट प्रकारची मानसिकता लादण्याचा हा प्रयत्न आहे. कर्मचाऱ्यांना अभिमानाने 'वंदे मातरम्' म्हणू द्या जबरदस्ती नको, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी केली. 

टॅग्स :Gulabrao Patilगुलाबराव पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसGovernmentसरकारJalgaonजळगाव