गुजराल पेट्रोलपंप परिसरातील घर फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 22:49 IST2019-09-17T22:48:52+5:302019-09-17T22:49:28+5:30

जळगाव - नातेवाईकांकडे कामानिमित्त गेलेल्या राकेश आनंद साळी यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी करीत सुमारे एक लाख रूपयांचा ऐवज ...

 Gujral petrol pumps raid homes | गुजराल पेट्रोलपंप परिसरातील घर फोडले

गुजराल पेट्रोलपंप परिसरातील घर फोडले

जळगाव- नातेवाईकांकडे कामानिमित्त गेलेल्या राकेश आनंद साळी यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी करीत सुमारे एक लाख रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुजराल पेट्रोल पंपानजीक उघडकीस आली आहे़ याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूध्द रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
गुजराल पेट्रोलपंप परिसरातील आॅडीटर कॉलनीत राकेश आनंद साळी हे कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत़ १५ सप्टेंबर रोजी ते कुटूंबीयांसह नातेवाईकांकडे काही कामानिमित्त सकाळी घरातून बाहेर निघाले होते़ त्यामुळे घरी कुणीही नव्हते़ रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी बंद घर असल्याची संधी साधत घराच्या दरवाजाचे लोखंडी ग्रील तोडून लाकडी दरवाजाचा कडी कोयंडा तोडला़ नंतर घरात प्रवेश करित चोरट्यांनी कपाटातील सोने व चांदीचे दागिने आणि काही रोकड असा सुमारे १ लाख रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला़ दुसऱ्या दिवशी सोमवारी साळी यांच्या घरा शेजारी राहत असलेले सूर्यवंशी यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले़ त्यांनी त्वरित राकेश साळी यांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली़ अखेर साळी यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title:  Gujral petrol pumps raid homes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.