भुसावळ येथे अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलनतर्फे ग्रुप डान्स स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 16:18 IST2018-11-12T16:17:35+5:302018-11-12T16:18:41+5:30

अखिल भारतीय मारवाडी महिला शाखेतर्फे राधा कृष्ण ग्रुप डान्स स्पर्धा पंचायती वाड्यात झाल्या. स्पर्धेत श्री कृष्णाची वेशभूषा मनमोहक साकारण्यात आली होती.

Group Dance Competition organized by All India Marwadi Mahila Sammelan at Bhusawal | भुसावळ येथे अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलनतर्फे ग्रुप डान्स स्पर्धा

भुसावळ येथे अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलनतर्फे ग्रुप डान्स स्पर्धा

ठळक मुद्देस्पर्धेत समाजातील २० ग्रुपने घेतला सहभागप्रथम बक्षीस नटखट कान्हा ग्रुपला, तर द्वितीय बक्षीस अपूर्वा ग्रुपलामान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण

भुसावळ, जि.जळगाव : अखिल भारतीय मारवाडी महिला शाखेतर्फे राधा कृष्ण ग्रुप डान्स स्पर्धा पंचायती वाड्यात झाल्या. स्पर्धेत श्री कृष्णाची वेशभूषा मनमोहक साकारण्यात आली होती.
या स्पर्धेत समाजातील बहुतेक महिलांनी व मुलींनी भाग घेतला होता. स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट नृत्य करणाऱ्यास बक्षिसे देण्यात आली. प्रथम बक्षीस नटखट कान्हा ग्रुृपला, तर दुसºया क्रमांकाचे बक्षीस अपूर्वा ग्रुपला, तर तिसरे बक्षीस जलसा ग्रुपला, उत्तेजनार्थ बक्षीस श्री गणेशाय ग्रुपला देण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून रजनी सावकारे होत्या. यावेळी मंडळ अध्यक्षा नीता तिवारी, सचिव हेमा बेहरा, प्रोजेक्ट चेअरमन भारती राठी, नेहा मंत्री, वर्षा जैन, वीणा अग्रवाल, सोनिया पांडे, वीणा जैन, कामिनी जैन, सपना नाहाटा, शशी लाहोटी, राजश्री कात्यायणी, अयोध्यादेवी मंत्री सजन टाक उपस्थित होत्या.
२० ग्रुपने स्पर्धेत सहभाग घेतला होता. परीक्षक म्हणून जळगाव येथील गोपाळ जोशी, पायल चेलानी हे होते. सूत्रसंचालन स्नेहा लढ्ढा व जयश्री भराडिया यांनी, तर आभार नीता तिवारी यांनी मानले.




 

Web Title: Group Dance Competition organized by All India Marwadi Mahila Sammelan at Bhusawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.