महात्मा गांधींना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:59 IST2021-02-05T05:59:03+5:302021-02-05T05:59:03+5:30

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून संमोहन तज्ज्ञ सागर कोळी व राजेंद्र दौड उपस्थित होते. यानंतर केंद्राचे ...

Greetings to Mahatma Gandhi | महात्मा गांधींना अभिवादन

महात्मा गांधींना अभिवादन

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून संमोहन तज्ज्ञ सागर कोळी व राजेंद्र दौड उपस्थित होते. यानंतर केंद्राचे संचालक नितीन विसपुते यांनी सर्वांना सत्याचे आचरण करण्याची शपथ दिली. यशस्वीतेसाठी अभिजित देशमुख, दीपक पाटील, मेघराज बोरसे, संतोष करंगे, हेमंत देवरे, भोला पाटील, प्रतीक सोनार यांनी परिश्रम घेतले.

चिंतन दिनाचे आयोजन

जळगाव : ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटीतर्फे संस्थेचे आद्य संस्थापक स्व. धर्मभूषण रावसाहेब रूपचंद मोतीलाल लाठी यांच्या ६७ व्या पुण्यतिथीनिमित्त २ फेब्रुवारी रोजी ‘चिंतन दिन’ साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विद्यालयात सकाळी ९.३० वाजता डॉ. जी. डी. बेंडाळे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. गौरी राणे यांचे ‘बदललेली शिक्षणप्रणाली’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

सपना रावलानी यांचा सत्कार

जळगाव : आदर्श सिंधी हायस्कूलमधील शिक्षिका सपना रावलानी यांची राज्य समता शिक्षक परिषद संघटनेच्या जळगाव जिल्हा उपक्रम विभाग उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सिंधी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजकुमार अडवाणी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी उपाध्यक्ष रमेशलाल कटारिया, सचिव वासुदेव तलरेजा आदी पदाधिकारी उपस्थित होते.

रमेश बनकर यांची निवड

जळगाव : वर्ल्ड पॉवर लिफ्टिंग फेडरेशनच्या उपाध्यक्षपदी रमेश बनकर यांची निवड करण्यात आली आहे. पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत बनकर हे १९७६ पासून कार्यरत आहेत. या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

Web Title: Greetings to Mahatma Gandhi