द्राक्षांना स्वाद, ‘हळद’ही घेणार आस्वाद!, नव्या पीक कर्जात सर्वाधिक रक्कम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 08:55 IST2025-04-04T08:54:23+5:302025-04-04T08:55:36+5:30
Jalgaon News: यंदाच्या खरीप, रब्बी हंगामासाठी सर्वाधिक कर्जाचा गोडवा द्राक्षे फळपिकासह हळदीला मिळणार आहे. कापसाच्या क्षेत्रासाठी नव्या कर्जदरात ‘जेमतेम’ तरतूद केली आहे.

द्राक्षांना स्वाद, ‘हळद’ही घेणार आस्वाद!, नव्या पीक कर्जात सर्वाधिक रक्कम
- कुंदन पाटील
जळगाव - यंदाच्या खरीप, रब्बी हंगामासाठी सर्वाधिक कर्जाचा गोडवा द्राक्षे फळपिकासह हळदीला मिळणार आहे. कापसाच्या क्षेत्रासाठी नव्या कर्जदरात ‘जेमतेम’ तरतूद केली आहे.
२०२५-२६ च्या हंगामासाठी राज्यस्तरीय तांत्रिक समितीने नवे पीक कर्जदर जाहीर केले आहेत. या समितीने ४४ पिकांसाठी कर्जदर निश्चित केले आहेत. त्यात खरीप, फळ, उन्हाळी, भाजीपाला, फूल, चारा पिकांचा समावेश आहे. सहकार आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील या समितीने नवे किमान व कमाल पीककर्ज दरानुसार जिल्हा बँकांनी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
‘स्ट्रॉबेरी’ला लाली
फुलपिकात निशिगंधाच्या लागवडीसाठी ५० ते ९० हजारांची शिफारस करण्यात आली आहे. ‘गुलाब’ शेतीला मात्र ५० ते ६५ हजारांची मर्यादा आहे.
फळपिकात स्ट्रॉबेरीसाठी २ लाख ६० हजार ते ५ लाख ४० हजारांच्या मर्यादेत कर्ज उपलब्ध होणार आहे.
द्राक्षानंतर सर्वाधिक कर्जदर उभ्या स्वरूपाच्या स्ट्रॉबेरीला लाभणार आहे.