पाण्यासाठी महिला धडकल्या ग्रामपंचायत कार्यालयावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 01:01 PM2017-08-16T13:01:13+5:302017-08-16T13:01:32+5:30

हंडा मोर्चा : कुलनलिकेची मागणी

Gram Panchayat office stalled for water | पाण्यासाठी महिला धडकल्या ग्रामपंचायत कार्यालयावर

पाण्यासाठी महिला धडकल्या ग्रामपंचायत कार्यालयावर

Next

ऑनलाईन लोकमत

जामठी, जि. जळगाव, दि. 16 - बोदवड   तालुक्यातील जामठी येथे वीस ते बावीस दिवस उलटूनही पाणीपुरवठा  न झाल्याने व बोरवेल आटल्याने येथील वार्ड क्र तीन मधील संतप्त महिला येथील ग्रामपंचायत कार्यालयावर हंडामोर्चा घेऊन धडकल्या. येथील महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर येथील सरपंच पुत्र कुलदिप माळकर यांना घेराव घालून पाणीपुरवठा कधी करणार असा जाब विचारला व वार्ड क्रमांक तीन मध्ये बोरवेल व्यतिरिक्त कुठलाही पाणीपुरवठा येथे होत नाही.व वार्डात एकही कुपनलीका(हातपंप) नसल्याने वापराच्या पाण्याकरिता येथील महिला व नागरिकांना एक किलो मीटर पयर्ंत भटकंती करावी लागत आहे.  70 रुपये टाकी प्रमाणे विकत घ्यावे लागेल आहे.  आमच्या वार्डामधे ताबडतोब कुपनलिका बसवून द्यावी अशी मागणी मोर्चेकरी महिलांनी केली.  

Web Title: Gram Panchayat office stalled for water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.