Gram Panchayat Election Result: मतमोजणीला गालबोट! जळगावात निकालांनंतर दोन गट भिडले, दगडफेकीत भाजपा कार्यकर्त्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 13:40 IST2022-12-20T13:39:26+5:302022-12-20T13:40:30+5:30
Gram Panchayat Election Result: जामनेर तालुक्यातील टाकळी येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दोन गट भिडले. हाणामारीत झालेल्या दगडफेकीत गंभीर जखमी झालेल्या धनराज माळी नावाच्या 25 वर्षीय भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू झाला.

Gram Panchayat Election Result: मतमोजणीला गालबोट! जळगावात निकालांनंतर दोन गट भिडले, दगडफेकीत भाजपा कार्यकर्त्याचा मृत्यू
- प्रशांत भदाणे
जळगाव - जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील टाकळी येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दोन गट भिडले. हाणामारीत झालेल्या दगडफेकीत गंभीर जखमी झालेल्या धनराज माळी नावाच्या 25 वर्षीय भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू झालाय. ही खळबळनक घटना आज दुपारी घडलीय.
या घटनेनंतर जामनेरच्या उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी व प्रचंड आक्रोश सुरू आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. टाकळी ग्रामपंचायतीत भाजप विरुद्ध भाजप अशी लढत होती. निवडणुकीच्या निकालानंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत दगडफेक झाली. दगडफेकीत धनराजच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात उपचारासाठी आणल्यानंतर मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. उपजिल्हा रुग्णालयात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी धाव घेतली आहे.