शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

हमीभाववाढीचा परिणाम : धान्य व डाळीच्या भावात २०० रुपयांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 12:41 IST

मालाची आवक मंदावली

ठळक मुद्देहळूहळू वाढ होणारसप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये अधिक भाववाढीची शक्यता

विजयकुमार सैतवालजळगाव : खरीप हंगामासाठी १४ पिकांच्या हमीभावात वाढ करण्याची केंद्र सरकारने घोषणा केल्यानंतर धान्य तसेच डाळींच्या भावात आतापासूनच वाढ होण्यास सुुरुवात झाली आहे. शहरात एकाच दिवसात धान्य व डाळींच्या भावात १०० ते २०० रुपये प्रती क्विंटलने वाढ झाली आहे.खरीप हंगामासाठी १४ पिकांच्या हमीभावात केंद्र सरकारने वाढ करण्याची घोषणा करीत ४ जुलै रोजी त्यावर केंद्रीय मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले. हमीभाव वाढविलेल्या पिकांमध्ये धान्य व कडधान्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.एकाच दिवसात मोठी वाढखरीप पिकांसाठी हा वाढीव हमीभाव मिळणार असला तरी आतापासूनच धान्य व डाळींचे भाव वधारत आहेत. ४ रोजी हमीभाव वाढीचा निर्णय झाला. त्यानंतर ६ जुलै रोजी उडीद डाळ वगळता इतर डाळी व ज्वारी, बाजरी यांच्या भावात वाढ झाली. ५ रोजी १४५० ते १५५० रुपये प्रती क्विंटल असलेल्या बाजरीचे भाव ६ रोजी १६५० ते १७५० रुपयांवर पोहचले. अशाच प्रकारे १४०० ते १५०० रुपये प्रती क्विंटल असलेले ज्वारीचे भाव ६ रोजी १७०० ते १९०० रुपये प्रती क्विंटल झाले. डाळींमध्ये ५५०० ते ५९०० रुपये प्रती क्विंटल असलेली तूर डाळ ५७०० ते ६१००, मूग डाळ ६४०० ते ६८०० वरून ६६०० ते ७००० आणि हरभरा डाळ ४४०० ते ४८०० वरून ४५०० ते ५००० रुपये प्रती क्विंटलवर पोहचली आहे. उडीद डाळ मात्र ४४०० ते ४८०० रुपयांवर स्थिर आहे.हळूहळू वाढ होणारकेंद्र सरकारने ज्या प्रमाणात हमीभावात वाढीची घोषणा केली आहे, त्या प्रमाणात आताची ही वाढ नसली तरी त्यात हळूहळू वाढ होण्याची शक्यता व्यापाºयांनी वर्तविली आहे. सध्या शेतकºयांकडे जो माल शिल्लक आहे, तो माल आता शेतकºयांनी बाजारात आणणे थांबविले आहे. खरीप हंगाम येईल त्या वेळी माल विक्री केल्यास अधिक फायदा होण्याची प्रतीक्षा राहणार असल्याने सध्या आवक मंदावली असल्याचे सांगितले जात आहे.मागणी नसताना भाववाढमागणी व पुरवठ्याच्या गणितानुसार चित्र पाहिले तर सध्या मागणी नसल्याने भाव कमी होणे अपेक्षित आहे. मात्र सध्या मागणी नसताना धान्य व डाळींच्या भावात वाढ झाली आहे. बाजारात आवक थांबल्याने व नवीन हंगाम येईपर्यंत मालाची उपलब्धता कशी असेल हे सांगता येत नाही, त्यामुळे हा परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे.सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये अधिक भाववाढीची शक्यतासध्या शालेय साहित्य खरेदीमुळे धान्य व डाळींच्या बाजारात उठाव नसतो. तसेच शेतकरीही शेती कामात व्यस्त असतो. त्यामुळे धान्य बाजारात सप्टेंबर-आॅक्टोबरपासून उलाढाल वाढीस सुरुवात होते. त्यात यंदा सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये नवीन हंंगामातील मालास वाढीव हमीभाव मिळण्यासह मागणी वाढून धान्य व डाळींचे भाव त्या काळात अधिक वाढण्याची शक्यता व्यापाºयांनी वर्तविली आहे.हमीभाव जाहीर झाल्यानंतर त्या प्रमाणात धान्य व डाळींचे भाव सध्या वाढले नसले तरी १०० ते २०० रुपये प्रती क्विंटलने त्यात वाढ झाली आहे. सध्या मालाची आवकही थांबल्याने त्याचा परिणाम होत आहे.- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, ग्रेन किराणा मर्चंट असोसिएशन, जळगाव.

टॅग्स :Market committee washimबाजार समिती वाशिमJalgaonजळगाव