विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देतो गुगल गुरुजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 01:03 AM2020-01-12T01:03:17+5:302020-01-12T01:04:03+5:30

जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत गुगल असिस्टंट या आपल्या मोबाइलमधील ‘गुगल गुरुजी’ विद्यार्थ्यांच्या सर्वच प्रश्नांची उत्तरे देऊ लागल्याने विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्का तर बसलाच पण गंमतही वाटली.

Google Guru answers students' questions | विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देतो गुगल गुरुजी

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देतो गुगल गुरुजी

googlenewsNext
ठळक मुद्देखडकी शाळेतील शिक्षकाचा नावीण्यपूर्ण उपक्रमविद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्का तर बसलाच पण गंमतही वाटली

मोहन सारस्वत/लियाकत सैयद
जामनेर, जि.जळगाव : तालुक्यातील खडकी येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत गुगल असिस्टंट या आपल्या मोबाइलमधील ‘गुगल गुरुजी’ विद्यार्थ्यांच्या सर्वच प्रश्नांची उत्तरे देऊ लागल्याने विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्का तर बसलाच पण गंमतही वाटली.
खडकी शाळेतील उपक्रमशील शिक्षक अनिल माळी यांनी गुगल गुरुजी कसे काम करतो. याचे प्रात्यक्षिक मुलांना करून दाखवले. ही जादू नसून विज्ञानाची कमाल आहे, असे सांगत आपण सर्वजण या गुगल गुरुजीचा वापर अगदी आपल्या घरीसुद्धा सहज करू शकतो. संगणक अथवा मोबाइल हे मानवी जीवनात कृत्रिम बुद्धिमत्तेची प्रतिके आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता बऱ्याच अंशी मानवी बुद्धीवर मात करताना आपणास दिसते. याचा वापर शैक्षणिक वाटचालीत उच्च शिक्षण घेताना होत असतो, असे त्यांचे म्हणणे आहे.
आपण कोणत्याही भाषेत प्रश्न विचारून आपणास तत्काळ योग्य व अचूक उत्तर मिळतेच. तसेच इतर संदर्भीय व्हिडिओसुद्धा बघायला मिळतात. हे गुगलचे वैशिष्ट्य आहे. मिळणारे उत्तर आपण कोणत्याही भाषेत व महिला किंवा पुरुष यांच्या आवाजातसुद्धा मिळवू शकतो.
माळी यांनी बाहुली आणून वर्गातील फळ्यासमोर टेबलवर ठेवली व त्यामागे स्पिकर फोन लावला व तो मोबाइलमधील ब्लू ट्रूथशी कनेक्ट केला. तिसरी व सहावीच्या वर्गात त्यांनी याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना करून दाखवले.
मुले कुतुहलाने वेगवेगळ्या प्रकारची प्रश्न विचारू लागली. गुगल गुरुजी अचूक व स्पष्ट उत्तर देऊ लागले. भावी काळात विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत गुगल असिस्टंट याचा मोलाचा वाटा असणार आहे. माळी यांच्या या उपक्रमाचे ग्रामस्थ व पालकांनी स्वागत केले आहे.
काय आहे गुगल गुरुजी?
फक्त ३०० रुपयाचे ब्लू टट्रूथ स्पीकर व १०० रुपयाचा एक हॅपी मॅन पुतळा यांच्यामुळे गुगल गुरुजी तयार झाला आहे. जगात आज सुमारे ५० कोटी स्मार्टफोन यूजर आहेत. म्हणजेच ५० कोटी गुगल गुरुजी मार्गदर्शनासाठी आपणास सहज उपलब्ध होऊ शकतात. प्रत्येक स्मार्टफोनच्या ‘होम-की’मध्ये बटन दाबून ठेवून गुगल गुरुजी म्हणजेच गुगल असिस्टंट काम करतो.

Web Title: Google Guru answers students' questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.