सहा हजारांच्या घसरणीनंतर सोने एक हजार रुपयांनी वधारले; चांदीचे भाव स्थिर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 07:14 IST2025-10-24T07:13:46+5:302025-10-24T07:14:55+5:30
१७ ऑक्टोबरचा अपवाद वगळता गेल्या आठवड्यापासून चांदीच्या भावात सतत घसरण होत आहे.

सहा हजारांच्या घसरणीनंतर सोने एक हजार रुपयांनी वधारले; चांदीचे भाव स्थिर
लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : बुधवारी (२२ ऑक्टोबर) सहा हजार रुपयांची घसरण झालेल्या सोन्याच्या भावात गुरुवारी एक हजार रुपयांची वाढ झाली. यामुळे सोने एक लाख २४ हजार रुपयांवर पोहोचले. तर बुधवारी आठ हजार रुपयांची घसरण झालेल्या चांदीचे भाव गुरुवारी एक लाख ५४ हजार रुपयांवर स्थिर होते.
१७ ऑक्टोबरचा अपवाद वगळता गेल्या आठवड्यापासून चांदीच्या भावात सतत घसरण होत आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीदेखील आठ हजार रुपयांनी घसरण होऊन चांदी एक लाख ६२ हजार रुपयांवर आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २२ ऑक्टोबर रोजीदेखील पुन्हा आठ हजार रुपयांची घसरण झाली व चांदी एक लाख ५४ हजार रुपयांवर आली. २३ ऑक्टोबर रोजी हे भाव स्थिर होते.