लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला चांदी एक हजाराने स्वस्त; सोनेही घटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 06:14 IST2025-10-21T06:12:59+5:302025-10-21T06:14:35+5:30
ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला चांदी एक हजाराने स्वस्त; सोनेही घटले
लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : गेल्या आठवड्यात मोठी भाववाढ झालेल्या चांदीच्या भावात शनिवारपाठोपाठ सोमवारीही घसरण झाली. एक हजार रुपयांनी भाव कमी होऊन चांदी १ लाख ७० हजार रुपयांवर आली.
सोन्याच्या भावात १०० रुपयांची घसरण होऊन ते १ लाख २८ हजार ४०० रुपयांवर आले. लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी दोन्ही मौल्यवान धातूंचे भाव कमी झाल्याने पूजनासाठी खरेदीत ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
गेल्या आठवड्यात चांदीच्या भावात सतत वाढ होत जाऊन ती एक लाख ९५ हजार रुपयांवर पोहोचली होती. त्यानंतर मोठी घसरण होत जाऊन १६ ऑक्टोबर रोजी ती १ लाख ७६ हजार रुपयांवर आली. त्यानंतर १७ ऑक्टोबर रोजी दोन हजार रुपयांची वाढ झाली. मात्र, १८ ऑक्टोबर रोजी थेट सात हजार रुपयांची घसरण झाली होती.