शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-भाजपा आणि डावे, निवडणुकीत कट्टर विरोधक आले एकत्र, या पक्षाविरोधात केली आघाडी   
2
असं काय झालं की 'या' देशाने तालिबानी अधिकाऱ्यांना थेट आपल्या देशात 'नो एन्ट्री' म्हटलं?
3
कुटुंबाला भेटायला निघालेल्या पोलीस अधिकाऱ्याला वाटेतच मृत्यूनं गाठलं; कार अपघातात पेटली अन् जागीच...
4
फडणवीस म्हणाले,१० फेऱ्या सुरू, रेल्वेला आयोगाची परवानगी हवी; उरण-नेरूळ-बेलापूर फेऱ्या वाढणार
5
पुतिन यांच्या भारत भेटीने का खूश झाला आहे पाकिस्तानचा 'हा' शेजारी देश? काय फायदा होणार?
6
बाबरी मशिदीच्या पायाभरणीवरून बंगालमध्ये वाद, विटा घेऊन निघाले हुमायूं कबीर यांचे समर्थक  
7
अनिल अंबानी यांची आणखी १,१२० कोटींची मालमत्ता जप्त; मुदत ठेवी, शेअर्सचाही समावेश
8
SMAT 2025 : डॉक्टरांमुळे इंदूरमध्ये क्रिकेटर्सची गैरसोय! आता पुण्यात रंगणार टी-२० चा थरार; कारण...
9
एसयूव्ही कार्स खरेदी करण्यासाठी सुवर्णकाळ! 'या' मॉडेल्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट; एकीवर तर ३.२५ लाखांची सूट
10
संबंध नसलेल्यांचे एसआरएवर नियंत्रण, राजकारण्यांना उच्च न्यायालयाचा टोला
11
IndiGo: पाणी नाही, जेवण नाही, कॅप्टनही गायब; इंडिगोच्या प्रवाशानं काढलेला व्हिडीओ एकदा बघाच!
12
Accident: अयोध्येला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात, जळगावची महिला ठार
13
१२ डिसेंबरपासून उघडतोय 'हा' आयपीओ; आतापासूनच ₹३५० च्या नफ्यावर पोहोचलाय GMP
14
Dhurandar Box Office: रणवीर सिंगच्या 'धुरंदर'ने पहिल्याच दिवशी धुव्वा उडवला! बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
15
Airfares Soar: मुंबई-पुणे विमानासाठी मोजा ६७,५०० रुपये; अन्य कंपन्यांनी प्रवाशांना प्रचंड लुटले
16
लग्नाचे कायदेशीर वय गाठलेले नसले तरीही ते दोघे स्वेच्छेने लिव्ह-इनमध्ये राहू शकतात; उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल
17
५३१ धावांचं आव्हान, सातव्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी, विंडीजकडून जोरदार पाठलाग, अखेरीस असा लागला निकाल  
18
महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा
19
धक्कादायक माहिती! गुजरातमधील मतदार याद्यांत १७ लाख मृतांची नावे
20
घटस्फोटाच्या ४ महिन्यानंतर मराठमोळ्या अभिनेत्रीने बांधली दुसऱ्यांदा लग्नगाठ, फोटो आला समोर
Daily Top 2Weekly Top 5

आठवडाभरात सोन्याच्या भावात १२०० रुपयांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 13:03 IST

आंतरराष्ट्रीय पातळीवर किंमती वाढण्यासह रुपयांतील घसरणीचा परिणाम

विजयकुमार सैतवालजळगाव : आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याच्या किंमती वाढण्यासह अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात झालेली घसरण तसेच लग्न सराईमुळे वाढलेली मागणी या सर्व कारणांमुळे सोन्याच्या भावात एकाच आठवड्यात तब्बल १२०० रुपये प्रती तोळ््याने वाढ झाली आहे.३० नोव्हेंबर रोजी ३० हजार ९०० रुपयांवर असलेले सोने ८ डिसेंबर रोजी ३२ हजार १०० रुपये प्रती तोळ््यावर पोहचून सोन्याचे पुन्हा एकदा ३२ हजाराच्या पुढे गेले आहे.आंतरराष्ट्रीय घडामोडी, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य या घटकांसह आंतरराष्ट्रीय पातळीवरील विशेषत: अमेरिकेतील सोने- चांदीच्या भावातील चढ-उताराचा परिणाम भारतीय सुवर्ण बाजारावर होत असतो. त्यानुसार आताही आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव वधारल्याने भारतातही सोन्याचे भाव वाढले आहे. या सोबतच गेल्या आठवड्यात ७०.७२ रुपयांवर असलेल्या अमेरिकन डॉलरचे दर या आज ७१. ७२ रुपयांवर पोहचल्याने सोन्याच्या भाववाढीस मदत होत आहे.लग्नसराईमुळे वाढली मागणीदसरा, दिवाळी काळात सोन्याची मोठी मागणी वाढल्याने दिवाळीमध्येदेखील सोने ३२ हजाराच्या पुढे गेले होते. मात्र त्यांनतर आंतरराष्ट्रीय पातळीवर भाव कमी झाल्याने व डॉलरच्या तुलेत भारतीय रुपयात सुधारणा झाल्याने सोन्याचे भाव गडगडले होते. तरीदेखील त्या काळात सोन्याला मागणी नव्हती. मात्र लग्नसराई सुरू होताच सोन्याला मागणी वाढली असून सुवर्णनगरी जळगावातील सुवर्णपेढ्या ग्राहकांनी फुलून गेल्या आहेत.दररोज १०० ते ३०० रुपयांनी वाढगेल्या आठवड्यापासून सोन्यामध्ये दररोज १०० ते ३०० रुपये प्रती तोळ््याने वाढ होत आहे. ३० नोव्हेंबर रोजी ३० हजार ९०० रुपये प्रती तोळा असलेल्या सोन्याच्या भावात एकाच दिवसात २०० रुपये प्रती तोळ््याने वाढ होऊन ते ३१ हजार १०० रुपयांवर पोहचले. त्यानंतर अशीच वाढ सुरू राहून ४ डिसेंबर रोजी सोने ३१ हजार ३०० रुपये प्रती तोळा झाले. पुन्हा ५ रोजी सोने ३१ हजार ४०० रुपये, ६ रोजी ३१ हजार ७०० रुपये, ७ रोजी ३१ हजार ९०० रुपयांवर सोने पोहचले आणि ८ डिसेंबर रोजी २०० रुपयांनी वाढ होऊन सोने ३२ हजार १०० रुपये प्रती तोळा झाले.चांदीतही ५०० रुपयांनी वाढचांदीच्या भावातही एकाच दिवसात ५०० रुपयांनी वाढ होऊन ती ३९ हजार रुपये प्रती किलोवरून ३९ हजार ५०० रुपयांवर पोहचली आहे. ५ डिसेंबर रोजी चांदी ३९ हजार रुपयांवर होती. ती ६रोजी ३९ हजार ५०० रुपये प्रती तोळा झाली. तेव्हापासून ती ३९हजार ५०० रुपयांवर स्थिर आहे.आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव वाढल्याने तसेच डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये घसरण झाल्याने सोन्याचे भाव वाढत आहे. या सोबतच लग्नसराईमुळे सोने-चांदीला मागणी वाढल्यानेही भाव वाढत आहे.- गौतमचंद लुणिया, जिल्हाध्यक्ष, सराफ बाजार असोसिएशन.

टॅग्स :GoldसोनंJalgaonजळगाव