सोन्याच्या भावात ४०० रुपयांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 11:42 AM2019-11-15T11:42:57+5:302019-11-15T11:43:41+5:30

भारतीय रुपयातील घसरणीचा परिणाम

Gold price hiked by Rs | सोन्याच्या भावात ४०० रुपयांनी वाढ

सोन्याच्या भावात ४०० रुपयांनी वाढ

googlenewsNext

जळगाव : आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने-चांदीचे भाव वाढण्यासह अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात झालेल्या घसरणीमुळे सोन्याचे भाव एकाच दिवसात ४०० रुपये प्रती तोळ््याने वाढून ३८ हजार ७०० रुपयांवर तर चांदीचे भाव ५०० रुपये प्रती किलोने वाढून ४५ हजार ५०० रुपयांवर पोहचले आहेत.
दिवाळी काळात खरेदी वाढल्याने मोठी भाव वाढ झालेल्या सोन्या-चांदीच्या भावात घसरण होऊन दहा दिवसात सोन्याच्या भावात ८०० रुपये प्रती तोळा तर चांदीच्या भावात दीड हजार रुपये प्रती किलोने घट झाली होती. त्यामुळे १२ नोव्हेंबर रोजी सोन्याचे भाव ३८ हजार ३०० रुपये प्रती तोळ््यावर आले होते तर चांदीचे भाव ४५ हजार रुपये प्रती किलोवर आले होते. मात्र आता आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने-चांदीचे भाव वाढण्यासह अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात घसरण झाल्यामुळे सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वधारले आहेत.
१२ नोव्हेंबर रोजी ७१.७४ रुपयांवर असलेले अमेरिकन डॉरलचे दर ७२ रुपयांवर पोहचल्याने सोन्याचे भाव ४०० रुपये प्रती तोळ््याने वाढून ३८ हजार ७०० रुपये प्रती तोळा तर चांदीत ५०० रुपये प्रती किलोने वाढून ४५ हजार ५०० रुपयांवर पोहचले आहेत.
लग्नसराईच्या खरेदीसाठी गर्दी
तुलसी विवाह होताच लग्नसराईची लगबग सुरू झाल्याने सोने-चांदीच्या खरेदीला वेग आला असून भाववाढ होत असली तरी खरेदीचा उत्साह कायम असल्याचे चित्र सुवर्णनगरीत आहेत. लग्नतिथी जसजशा जवळ येतील तसतशी खरेदीसाठी गर्दी वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने-चांदीचे भाव वाढण्यासह अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात झालेल्या घसरणीमुळे भारतात सोने-चांदीचे भाव वाढले आहेत. सध्या खरेदीसाठी गर्दी वाढत असून लग्नसराईमुळे ही गर्दी आणखी वाढू शकते.
- स्वरुप लुंकड, सचिव, जळगाव शहर सराफ असोसिएशन.

Web Title: Gold price hiked by Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव