८८,४०० सोने, तर चांदी १,००,७०० रुपयांवर; जीएसटीसह असे आहेत भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 06:53 IST2025-03-16T06:53:22+5:302025-03-16T06:53:47+5:30

सोने-चांदी ५ महिन्यांपासून नवनवीन उच्चांक गाठत आहेत. त्यानंतर अमेरिकेत ट्रम्प सरकार आल्यापासून घेण्यात येत असलेल्या निर्णयांमुळे सोने-चांदी वधारू लागले. १२ मार्चला चांदीच्या भावात एक हजार रुपयांनी वाढ होऊन ती ९९ हजारांवर पोहोचली.

Gold at Rs 88400 silver at Rs 100700 These are the prices including GST | ८८,४०० सोने, तर चांदी १,००,७०० रुपयांवर; जीएसटीसह असे आहेत भाव

८८,४०० सोने, तर चांदी १,००,७०० रुपयांवर; जीएसटीसह असे आहेत भाव

जळगाव : सोने-चांदीच्या भावात पुन्हा एकदा मोठी वाढ होऊन सोने ८८ हजार ४०० रुपये प्रतितोळा, तर चांदी एक लाख ७०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे. दोन्हीही धातूंचे हे आतापर्यंतचे उच्चांकी भाव आहेत. 

सोने-चांदी ५ महिन्यांपासून नवनवीन उच्चांक गाठत आहेत. त्यानंतर अमेरिकेत ट्रम्प सरकार आल्यापासून घेण्यात येत असलेल्या निर्णयांमुळे सोने-चांदी वधारू लागले. १२ मार्चला चांदीच्या भावात एक हजार रुपयांनी वाढ होऊन ती ९९ हजारांवर पोहोचली. १३ व १४ रोजी याच भावावर स्थिर राहिल्यानंतर शनिवारी चांदीत एक हजार ७०० रुपयांची वाढ झाली व ती थेट एक लाख ७०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचली. अशाच प्रकारे १२ मार्चला सोने ८६ हजार ६०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचल्यानंतर १३ रोजी त्यात ७०० रुपयांची वाढ होऊन ते ८७ हजार ३०० रुपये झाले. शनिवारी त्यात एक हजार १०० रुपयांची वाढ झाली. 

लाखमोलाची चकाकी
२३ ऑक्टोबर २०२४ रोजी चांदी एक लाख रुपये प्रतिकिलोवर पोहोचली. त्यानंतर भाव कमी झाले. आता चांदीने एक लाखाचा पल्ला ओलांडला. 

असे आहेत भाव
धातू    मूळ भाव    जीएसटीसह 
सोने    ८८,४००    ९१,०५२
चांदी    १,००,७००    १,०३,७२१
 

Web Title: Gold at Rs 88400 silver at Rs 100700 These are the prices including GST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.