बांबरुड येथील आगीत शेळ्या ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 17:27 IST2018-12-18T17:25:42+5:302018-12-18T17:27:30+5:30
भडगाव तालुक्यातील बांबरुड प्र. ब. येथील शेतकरी भिकन बुधा परदेशी यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडला अचानक आग लागली.

बांबरुड येथील आगीत शेळ्या ठार
ठळक मुद्देजनावरे होरपळली,शेती साहित्य खाक,पावणेदोन लाखाचे नुकसानठिबक सिंचन संच, फायबरच्या टाकीचे नुकसान
भडगाव : भडगाव तालुक्यातील बांबरुड प्र. ब. येथील शेतकरी भिकन बुधा परदेशी यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडला अचानक आग लागली. या आगीत २ शेळ्या होरपळून ठार झाल्या. आगीत भाजल्याने ३ गायी, १ म्हैस, १ पारडू गंभीर जखमी झाले असून अत्यवस्त स्थितीत आहेत. ठिबक सिंचन संच, चारा कुटटी, शेड, फायबरची टाकी आदी साहित्य जळून खाक झाले आहे. या आगीत सुमारे १ लाख ८४ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा महसूल विभागातर्फे करण्यात आला आहे. आगीची ही १८ डिसेंबर रोजी रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली. आगीचे कारण समजू शकले नाही.