शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

चाळीसगावला युवारंग महोत्सवाचा शानदार शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 1:12 PM

बहिणाबाईंच्या स्मृतींना उजाळा

चाळीसगाव, जि. जळगाव : खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मृतींचा जागर करुन सोमवारी चाळीसगाव महाविद्यालयात सकाळी नऊ वाजता एरंडोल विभागाच्या आंतरमहाविद्यालयीन युवारंग महोत्सवाचे उदघाटन विद्यापीठाचे कुलसचिव बी.बी.पाटील यांच्याहस्ते झाला. यावेळी चाळीसगाव शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग बोडार्चे चेअरमन नारायणदास अग्रवाल, उमंग समाजशिल्पी महिला परिवाराच्या अध्यक्षा संपदा उन्मेष पाटील, चाळीसगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, उपाध्यक्ष मिलिंद देशमुख, सचीव डॉ. विनोद कोतकर, महाविद्यालयाचे चेअरमन डॉ. एम.बी.पाटील, अ‍ॅड. प्रदीप अहिरराव, मु.रा.अमृतकार, विश्वस्त मो.हु.बुंदेलखंडी, अ.वि.येवले यांच्यासह विद्यापिठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य अनिल इंगळे, प्रा. नितिन बारी, प्रा. दीपक पाटील, सिनेट सदस्य दिनेश नाईक, नितिन झाल्टे, विद्यार्थी कल्याण विभागाचे प्रमुख, प्रा.डॉ. सत्यजित साळवे, प्रा. विलास चव्हाण, प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर, चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.आर.जाधव, उपप्राचार्य प्रा. डॉ. अजय काटे, प्रा.डॉ. प्रकाश बाविस्कर, एरंडोल विभागाचे समन्वयक प्रा.डॉ. पंकजकुमार नन्नवरे आदी उपस्थित होते.जात फिरवून झाला शुभारंभउमविचा बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठ असा नामविस्तार झाल्यानंतरचा प्रथम युवारंग महोत्सव चाळीसगावी होत आहे. महोत्सवात बहिणाबाई चौधरी यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. त्यांच्या कवितांमध्ये ग्रामीण संस्कृतीचे दर्शन होत असल्याने युवारंग महोत्सवाचे उदघाटन जातं फिरवून केले गेले. रंगमंचच्या डाव्या बाजूस बहिणाबाई चौधरी या जात्यावर धान्य दळत असल्याचा सजीव देखावा साकारण्यात आला होता. सुगरणीचा खोपा, चुलीवर स्वयंपाक करणारी नऊवारीतील गृहिणी महोत्सवाचे खास आकर्षण ठरले. बहिणाबाईंच्या वेषभूषेतील प्रा. सावित्री राठोड यांच्या जात्यात मान्यवरांनी धान्य टाकून महोत्सवाचे उदघाटन केले. पुढील वषार्पासून विद्यापिठ स्तरावर विद्यार्थी साहित्य संमेलन घेण्यात येणार असल्याचे सूतोवाच यावेळी बी.बी.पाटील यांनी केले. कला माणसाला जीवनावर प्रेम करायला शिकवते. त्यासाठी ध्येयाचा पाठलाग करा. असे संपदा पाटील यांनी सांगितले. चाळीसगावात प्रथमच युवारंग महोत्सव होतोयं. ही अभिमानाची बाब असल्याचे नारायणदास अग्रवाल यांनी नमूद केले.महोत्सवासाठी सहा रंगमंच तयार करण्यात आले असून २१ महाविद्यालयातील ५०० युवा कलावंत सहभागी झाले आहेत. सुत्रसंचालन प्रा.डॉ. किरण गंगापुरकर यांनी केले. आभार प्रा. डॉ. पंकजकुमार नन्नवरे यांनी मानले.

टॅग्स :ChalisgaonचाळीसगावJalgaonजळगाव