पाचोरा येथील शिंदे विद्यालयात गुणगौरव समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 23:59 IST2019-01-04T23:58:44+5:302019-01-04T23:59:50+5:30

पाचोरा येथील शिंदे विद्यालयात विद्यार्थी गुणगौरव समारंभ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम पी.के.शिंदे विद्यालयात उत्साहात झाला.

The Giving ceremony at Shinde School, Pachora | पाचोरा येथील शिंदे विद्यालयात गुणगौरव समारंभ

पाचोरा येथील शिंदे विद्यालयात गुणगौरव समारंभ

ठळक मुद्देप्रतिमा पूजन करून सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरवविद्यार्थ्यांनी आई-वडिलांना आनंद होईल, असे गुण दाखवून संस्कार जोपासावे

पाचोरा, जि.जळगाव : येथील शिंदे विद्यालयात विद्यार्थी गुणगौरव समारंभ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम पी.के.शिंदे विद्यालयात उत्साहात झाला.
संस्थाध्यक्ष पंडितराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास अटल पणन संचालक प्रा .गणेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती, तर पाचोरा बाजार समितीचे सभापती सतीश शिंदे, अमोल शिंदे, अ‍ॅड.जे.डी.काटकर, नीरज मुनोत, श्रीराम पाटील, शिवाजी शिंदे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.व्ही. गीते, प्राथमिकचे मुख्याध्यापक सु ना पाटील, यांचेसह शिक्षक पालक विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव केला.
प्रा.गणेश शिंदे यांनी विद्यार्थी, शिक्षक, पालकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी आई-वडिलांना आनंद होईल, असे गुण दाखवून आजी आजोबांचे संस्कार जोपासावे. परीक्षेतील गुणांपेक्षा चांगल्या संस्कारांना अधिक महत्व असते. यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संस्काराचेही धडे दिले पाहिजे. आपला पाल्य संस्कारित राहण्याकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे, असे मार्गदर्शन केले.
यावेळी शिंदे विद्यालयातील शिक्षकांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याने पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेतर्फे बाळू पवार, सागर, कोतकर, पाटील यांचा सन्मान करण्यात आला, इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध विषयांत उत्कृष्ट गुण मिळाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन डी.आर. कोतकर, सुषमा पाटील यांनी केले.

Web Title: The Giving ceremony at Shinde School, Pachora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.