शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

नांदगाव बसमध्ये विद्यार्थिनींची छेडखानी, बस थेट पोलीस स्टेशनमध्ये

By ajay.patil | Updated: November 2, 2023 16:31 IST

पोलीसांकडे बस नेताच, टवाळखोराने बसमधून मारली उडी, इतर विद्यार्थ्यांना दाखवला चॉपरचा धाक

जळगाव - नवीन बसस्थानकाहून निघालेल्या नांदगाव-नांद्रा बसमध्ये एका टवाळखोराने विद्यार्थिनींची छेड काढल्यानंतर, चालक व वाहकाने बस गावात न नेता थेट तालुका पोलीस स्टेशनमध्ये आणल्याची घटना गुरुवारी दुपारी ३ वाजता घडली. बस थेट पोलीसांकडे नेत असल्याचे कळल्यावर टवाळखोर युवक आव्हाणे फाट्याजवळ बसमधून उडी मारून पसार झाला. या प्रकरणी त्या युवकाविरोधात तालुका पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.

गुरुवारी दुपारी १.३० वाजता शहरातीलन नवीन बसस्थानकाहून (एम.एच.८०,वाय ५१९३) जळगाव-नांदगाव ही बस निघाली. दुपारची १२.३० वाजेची बस न गेल्यामुळे या बसमध्ये नांदगाव, कानळदा, नांद्रा, फेसर्डी या भागातील विद्यार्थी-विद्यार्थिनींची संख्या मोठ्या प्रमाणात होती. तर इतर प्रवाशांचीही संख्या मोठी असल्याने बस खच्चून भरली होती. बस आव्हाणे फाट्याच्या पुढे गेल्यानंतर बसमधील एका टवाळखोराने इतरांच्या साथीने बसमधील विद्यार्थिनींची छेड काढण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थिनींनी वाहकाकडे तक्रार केल्यानंतर वाहक लोटन पाटील यांनी संबधित टवाळखोराला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही संबधित टवाळखोराकडून बसमध्ये गोंधळ घालून, विद्यार्थिनींसमोर चित्र-विचित्र हावभाव करून छेडखानी करण्याचा प्रयत्न सुरु होताच. त्यानंतर बस नांद्रा फाट्यावर आली असताना, विद्यार्थिनींना होणारा त्रास वाढल्याने, वाहक लोटन पाटील यांनी  चालक तुकाराम रायसिंग यांना बस थेट तालुका पोलीस स्टेशनमध्ये नेण्याच्या सूचना दिल्या.

नाव सांगणाऱ्या विद्यार्थ्यांना चॉपर दाखवून दिली धमकीनांद्रा गाव केवळ १ किमी वर असताना चालकाने बस गावात न नेता थेट जळगावकडे पुन्हा फिरवली. यामुळे पोलीसांच्या भितीने घाबरलेल्या टवाळखोर युवकाने बस थांबविण्याची विनंती केली. मात्र, चालकाने बस न थांबवता, तालुका पोलीस स्टेशनकडे नेली. बस थांबणार नाही, हे कळल्यामुळे संबधित युवकाने पोलीसांकडे नाव सांगणाऱ्यांना थेट चॉपर दाखवून धमकी दिली. त्यातच आव्हाणे फाट्याजवळ युवकाने चालत्या बसचा दरवाजा उघडून उडी मारून, त्याठिकाणाहून पसार झाला. मात्र, चालकाने तरीही बस तालुका पोलीस स्टेशनला आणली. या प्रकरणी विद्यार्थी, चालकाने दिलेल्या फिर्यादीनुसार त्या युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोखंडे करत आहेत. 

टॅग्स :Studentविद्यार्थीMolestationविनयभंगJalgaonजळगावPoliceपोलिस