शहरं
Join us  
Trending Stories
1
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
2
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
3
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
4
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
5
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
6
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
7
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
8
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
9
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
10
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
11
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
12
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
13
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
15
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
16
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
17
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
18
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
19
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले

प्रशासनाच्या जाचक अटीमुळे जिनिंग संघटनांचा जिनिंग सुरू करण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 4:29 PM

जाचक अटींमुळे जिनिंग संघटनांनी जिनिंग उद्योग सुरू करण्यास नकार दिला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील शंभरावर जिनिंगमध्ये शेतकऱ्यांसह मजूर मेटाकुटीसपाच मजुरांच्या नियमात जिनिंग चालवणे अशक्य

गोपाळ व्यासबोदवड, जि.जळगाव : केवळ पाच मजुरांवर जिनिंग सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. या जाचक अटींमुळे जिनिंग संघटनांनी जिनिंग उद्योग सुरू करण्यास नकार दिला आहे.जळगाव जिल्ह्यात पांढºया सोन्याचे नंदनवन असून कापसाच्या उत्पादनासह कापसावर उद्योग धंदे, जिनिंग त्याचप्रमाणे प्रेसिंग, पेंड, सरकी व सरकी तेलाचे शेकडो कारखाने आहे. यात निव्वळ कापसाच्या शंभरावर जिनिंग आहेत. लॉकडाऊनमुळे लाखो टन कापूस आजही शेतकºयाच्या घरात पडला आहे, तर या कापसावर चालणाºया शंभरावर जिनिंगची धडधड गत महिन्यापासून बंद पडली असून, यात लाखोंचा रोजगार गेला आहे, तर जिनिंगचालकांवर व्यवसाय कर्जाचे व्याज सुरूच आहे.यासंदर्भात २१ रोजी जिल्ह्यातील जिनिंग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हाधिकाºयांसोबत बैठक झाली. त्यात जिनिंग उद्योग सुरू करण्यास परवानगी मिळाली. परंतु जिल्हाधिकाºयांनी कोरोनाचे संकट व वाढता प्रभाव पाहता काही अटींवर जिनिंग सुरू करण्यास परवानगी दिली. त्यात जिनिंगमध्ये जास्तीत जास्त पाच मजूर असावे. यापेक्षा जास्त नसावे. त्यात त्यांना मास्क, सॅनिटायझर तसेच सुरक्षित अंतर व सोशल डिस्टन्सिंग ठेवून काम करावे. काही अनुचित घटना घडून कोरोनासारख्या आजाराची लागण झाल्यास सर्वस्वी जबाबदारी जिनिंग चालकाची असेल. नंतर २५ दिवस जिनिंग सील करण्यात येईल, असे स्पष्ट आदेश काढले आहेत.एकीकडे कोरोनाचा आजार पाहता प्रशासन आपल्या ठिकाणी योग्य आहे तर व्यापारी आपल्या ठिकाणी योग्य आहे. यामुळे समस्त खानदेश जिनिग असोसिएशनचे उपाध्यक्ष अरविंद बरडिया यांनी या विषयावर संघटनेशी सल्ला मसलत करत हा विषय स्थगित ठेवला असल्याचे सांगितले.बोदवड तालुक्यात आज घडीला ११ जिनिंग आहेत. प्रत्येक जिनिग्ांला एक शिफ्टला काम करण्यास किमान ५० मजुरांची गरज आहे. त्यात कापूस वाहून नेणे, माल उतवणारे, सरकवणारे, गठाणी तयार करणारे व जीन चालवणारे अशा कमीत कमी ५० मजुरांची गरज आहे. त्यामुळे जिनिंग चालवणे शक्य नाही. हाच नियम केंद्राच्या कापूस खरेदी केंद्र (सीसीआय) लादेखील लागू असल्याने त्यांनीही खरेदीस नकार दिल्याने जिनिंग भाडे तत्वावर देणाºयाकडून सांगण्यात आले आहे.आजच्या स्थितीत शेकडो टन कापूस शेतकºयाच्या घरात पडला आहे. शेतकरीही मेटाकुटीस तर व्यापाºयासह मजूर वर्गही रडकुंडीला आला आहे. येत्या काही दिवसांवर पेरणीला सुरुवात होईल. मग घरातील कापसाचे काय करावे, हा प्रश्न शेतकºयाला पडला आहे. दरम्यान, कापूस खरेदी केंद्र पाच हजार शंभर ते तीनशेच्या दरात कापूस खरेदी करत होते, तर जिनिंग चालक चार हजार पाचशे ते सातशेच्या प्रति क्विंटलने खरेदी करत होते. परंतु कोरोनाच्या संकटात सर्व बंद पडल्याने सर्वच हतबल झाले आहे.आजच्या स्थितीत किमान १५ मजूर तरी जिनिंग सुरू करण्यास द्यावे. तसेच आम्हाला सुरक्षा शासनाने द्यावी. जिल्हाधिकाºयांच्या अटींनुसार आम्ही व्यवसाय सुरू करूच शकत नाही. परिणामी लॉकडाऊनपर्यंत जिनिग बंद ठेवण्याचे ठरवले आहे.-शिरीष जैन, जिनिंग चालक, बोदवड

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBodwadबोदवड