एकही सिझर न करता, सामान्य प्रसूती करणाऱ्या डॉक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 00:44 IST2020-03-08T00:43:00+5:302020-03-08T00:44:04+5:30
ग्रामीण भागात एकही सिझर न करता, नॉरमल डिलेव्हरी करणाºया डॉक्टर म्हणून कळमसरे, ता.अमळनेर येथील विजया सुधाकर नेमाडे यांनी परिसरात आपले स्थान निर्माण केले आहे.

एकही सिझर न करता, सामान्य प्रसूती करणाऱ्या डॉक्टर
जी.टी.टाक ।
कळमसरे, ता.अमळनेर, जि.जळगाव : ग्रामीण भागात एकही सिझर न करता, नॉरमल डिलेव्हरी करणाºया डॉक्टर म्हणून कळमसरे, ता.अमळनेर येथील विजया सुधाकर नेमाडे यांनी परिसरात आपले स्थान निर्माण केले आहे.
प्रसूती स्रिचा निसर्गदत्त हक्क
प्रसूती हा प्रत्येक स्रिचा निसर्गदत्त हक्क असला तरी प्रसूती म्हटली म्हणजे एकप्रकारे त्या स्रिचा पुनर्जन्मच असतो. त्यातल्या त्यात सिझर म्हटल्यावर कुटुंबातील सदस्यांच्या काळजाचा ठोका मोजणाराच ठरतो. प्रत्येक शहरात ऊच्च विद्याविभूषित प्रसूतीतज्ज्ञ डॉक्टर कार्यरत असतात, प्रसूतीसाठी माता भगिनी दवाखान्यात दाखल होत असतात. काही अपवाद वगळले तर बहुतांश अगदी पहिल्या प्रसूतीपासून सिजरींगचे प्रमाण हल्ली जास्तच जाणवायला लागले. याला अपवाद मात्र ठरल्यात ग्रामीण भागातील त्या अवघ्या डी.एच.एम.एस. झालेल्या महिला डॉक्टर विजया नेमाडे.
गर्भात मूल आडवे
कळमसरे गावातील एका माहेरवासीण महिलेला सासरी अमरावती शहरात प्रसूतीतज्ज्ञ नामांकित सर्जन डॉक्टरांनी गर्भात मूल आडवे असण्याची शक्यता वर्तवून सिझरशिवाय पर्याय नाही म्हणून सलग पंधरा दिवस दवाखान्यातच बेडरेस्ट सक्तीची केली. डॉ.विजया नेमाडे यांनी काहीही निमित्त करून त्या महिलेला कळमसरे गावी बोलावून घेतले. गर्भवाढी संबंधातील सर्व औषधी तत्काळ बंद केली अन आश्चर्य म्हणजे त्या महिलेने गोंडस, सुदृढ अशा बाळाला नॅचरल डिलेवरीने जन्म दिला. डॉ.नेमाडे यांनी सर्वांनाच आश्चर्यात टाकले. हे सत्य घटनेवरील त्यांच्या नॅचरल डिलेवरी हातखंडाचे बोलके उदाहरणच त्यांच्या कार्यकर्तृृत्वाचा, अनुभवाचा पुरावा पुरेसा आहे. अशी कितीतरी उदाहरणे आहेत.
४० वर्षांची सेवा
सन १९८१ साली डी.एच.एम.एस.झाल्यापासून सलग तब्बल ४० वर्षाच्या त्यांच्या वैद्यकीय सेवेत त्यांनी शेकडो महिलांची प्रसूती अगदी सहजगत्या, नाममात्र शुल्कात तेही एकही सिझर न करता सर्व नॅचरल डिलेवरीच.