पाचोरा येथे महिलेवर सामूहिक बलात्कार, आरोपींची काढली धिंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 12:56 IST2019-04-20T12:55:54+5:302019-04-20T12:56:23+5:30

दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Gang raped by women in Pachora, gang rape | पाचोरा येथे महिलेवर सामूहिक बलात्कार, आरोपींची काढली धिंड

पाचोरा येथे महिलेवर सामूहिक बलात्कार, आरोपींची काढली धिंड

पाचोरा, ता. जळगाव : रुग्णालयातून काम आटोपून घरी परतत असलेल्या महिलेला रिक्षामध्ये टाकून शेतात तिच्यावर दोघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना पाचोरा येथे घडली. या प्रकरणी महिलेच्या घरा समोरच राहणारा पिंटू उर्फ गोविंद दत्तू पुजारी (३६, रा. हनुमान नगर, ता. पाचोरा) व त्याचा मित्र रिक्षा चालक नुरा फत्तू पटेल (५०, रा. शिवाजीनगर, पाचोरा) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून रात्री पिंटू पुजारी यांची धिंड काढण्यात आली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला १९ रोजी संध्याकाळी रुग्णालयातून घरी परतत असताना दोघांनी तिला रिक्षामध्ये बसवून तारखेडा रस्त्यावरील एका शेतात नेले व दोघांनी बलात्कार केला. महिलेचे पती, सासू, सासरे बाहेर गावी गेलेले असल्याने रात्री महिलेने हा प्रकार शेजारच्या मंडळींना सांगितला. त्या वेळी पिंटू पुजारी याची धिंड काढत त्याला पोलीस ठाण्यात नेले. तेथे महिलेच्या फिर्यादीवरून शनिवारी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Gang raped by women in Pachora, gang rape

टॅग्स :Jalgaonजळगाव