मोटारसायकल चोरणाऱ्या चारजणांच्या टोळीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 22:25 IST2021-06-09T22:25:28+5:302021-06-09T22:25:48+5:30
पाचोरा आणि आसपासच्या परिसरातून मोटारसायकल चोरी करणाऱ्या चार जणांच्या टोळीस अटक करण्यात आली आहे.

मोटारसायकल चोरणाऱ्या चारजणांच्या टोळीस अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
पाचोरा : पाचोरा आणि आसपासच्या परिसरातून मोटारसायकल चोरी करणाऱ्या चार जणांच्या टोळीस अटक करण्यात आली आहे. सलमान गुल्लू पिंजारी, फिरोज पिंजारी, शाहरुख शेख शेखलाल व शकूर टकरी फिरोज पिंजारी (रा. पाचोरा) अशी या अटक करण्यात आलेल्या चोरांची नावे आहेत.
मागील बऱ्याच दिवसापासून पाचोरा शहरात मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले आहे. सुरुवातीला सलमान पिंजारी यास ताब्यात घेऊन विचारपूस करण्यात आली. त्याने या चोरीचे बिंग फोडले आणि या तीनही जणांची नावे सांगितली. या चारही जणांनी पाचोरा शहरात विविध ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे.
आरोपींना तीन दिवसाची कोठडी देण्यात आली आहे. त्यांच्याकडून पाचोरा शहरातील चार मोटारसायकली व औरंगाबाद येथे चोरून आणलेली एक मोटर सायकल जप्त करण्यात आली आहे. डीवायएसपी भरत काकडे तसेच पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील कर्मचारी राहुल सोनवणे,मल्हार देशमुख,दीपक सुरवाडे, विनोद बेलदार, राहुल बेहरे, किरण पाटील, होमगार्ड कौतिक पाटील, मिलिंद माळी यांनी ही कामगिरी बजावली.