शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
2
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
3
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
4
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
5
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
6
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
7
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
8
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
9
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
10
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
11
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
12
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
13
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
14
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
15
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
16
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
17
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
18
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
19
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
20
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं

अट्टल घरफोड्या एलसीबीकडून गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 10:44 PM

जळगाव - मालकाला ट्रक खराब झाल्याचे सांगून दिवसा गल्ली-बोळांमध्ये रेकी करायची व नंतर रात्री चोरीचा डाव साध्य करणाऱ्या अट्टल ...

जळगाव- मालकाला ट्रक खराब झाल्याचे सांगून दिवसा गल्ली-बोळांमध्ये रेकी करायची व नंतर रात्री चोरीचा डाव साध्य करणाऱ्या अट्टल घरफोड्या संजय भंवरलाल देवडा (वय-४५, रा़ जयतरन, ता़ पाली, राजस्थान) यास राजस्थान येथून जळगाव स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अटक केली आहे़ दरम्यान, देशभरात अनेक ठिकाणी याने डल्ला मारला असून भाजीपाला व्यावसायात तोटा झाल्यामुळे पुन्हा चोरीकडे वळल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे़निमखेडी रस्त्यावरील गिरनाई कॉलनी येथील रहिवासी प्रा़ रमेश जगदेव सरदार हे २७ आॅक्टोबर रोजी कुटूंबीयांसोबत मुळगावी चिखली येथे दिवाळीनिमित्त गेले होते़ हीच संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात डल्ला मारीत सुमारे दोन ते अडीच लाख रूपयांचा ऐवज चोरून नेला होता़ २९ रोजी सरदार हे घरी परतल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे आढळून आले़ त्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता़ याप्रकरणी संजय देवडा यास राजस्थान येथून स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव