अट्टल घरफोड्या एलसीबीकडून गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 22:44 IST2019-11-12T22:44:18+5:302019-11-12T22:44:28+5:30

जळगाव - मालकाला ट्रक खराब झाल्याचे सांगून दिवसा गल्ली-बोळांमध्ये रेकी करायची व नंतर रात्री चोरीचा डाव साध्य करणाऱ्या अट्टल ...

Gajaad from the atrocious LCB | अट्टल घरफोड्या एलसीबीकडून गजाआड

अट्टल घरफोड्या एलसीबीकडून गजाआड

जळगाव- मालकाला ट्रक खराब झाल्याचे सांगून दिवसा गल्ली-बोळांमध्ये रेकी करायची व नंतर रात्री चोरीचा डाव साध्य करणाऱ्या अट्टल घरफोड्या संजय भंवरलाल देवडा (वय-४५, रा़ जयतरन, ता़ पाली, राजस्थान) यास राजस्थान येथून जळगाव स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अटक केली आहे़ दरम्यान, देशभरात अनेक ठिकाणी याने डल्ला मारला असून भाजीपाला व्यावसायात तोटा झाल्यामुळे पुन्हा चोरीकडे वळल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे़

निमखेडी रस्त्यावरील गिरनाई कॉलनी येथील रहिवासी प्रा़ रमेश जगदेव सरदार हे २७ आॅक्टोबर रोजी कुटूंबीयांसोबत मुळगावी चिखली येथे दिवाळीनिमित्त गेले होते़ हीच संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात डल्ला मारीत सुमारे दोन ते अडीच लाख रूपयांचा ऐवज चोरून नेला होता़ २९ रोजी सरदार हे घरी परतल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे आढळून आले़ त्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता़ याप्रकरणी संजय देवडा यास राजस्थान येथून स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे़

Web Title: Gajaad from the atrocious LCB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.