शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

एरंडोल येथील जवानावर उद्या होणार अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 21:41 IST

बी. एस. एफचे जवान राहूल लहू पाटील यांचे पार्थिवावर रविवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

ठळक मुद्दे पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.

लोकमत न्यूज नेटवर्क

एरंडोल : बी.एस.एफचे  जवान राहूल लहू पाटील यांचे पार्थिवावर रविवारी सकाळी १० वाजता एरंडोल येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रामलिला मैदानावर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होऊन त्यांना शेवटचा निरोप देण्यात येणार आहे.

राहूल लहू पाटील यांचे पार्थिव घेऊन बी.एस.एफचे वाहन  शनिवारी सायंकाळी ४:२० वाजता इंदूर येथून निघाले आहे.  रविवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघणार आहे. दरम्यान दिवंगत जवान राहूल यांची पत्नी ज्योती पाटील यांनी 'आयुष्यभराचा जोडीदार,अशी पोस्ट फेसबुकवर टाकली होती. राहूल पाटील यांचे मुळ गाव एरंडोल तालुक्यातील उत्राण(अ.ह.) हे आहे.  जवळपास १८ वर्षांपासून त्यांचा परिवार गांधीपुरा भागातील शंकरनगर या नव्या वसाहतीत वास्तव्यास आहे.  पितृछत्र त्यांच्या बालपणातच हरपले आहे. 

आईने मोलमजुरी करून राहूल व दीपक या दोन्ही मुलांचे संगोपन केले.  राहूल यांचा मोठा भाऊ दिपक लहू पाटील (३२), त्याची आई,पत्नी व मुलाबाळांसह एरंडोल येथे राहत आहेत. दीपक हा गँरेजवर काम करून आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवित आहे. 

राहूलच्या परिवाराला त्याच्या लहानपणापासूनच गरीबीशी संघर्ष करावा लागत आहे. राहूल पाटील यांचे सासर देवळी-आडगाव ता.चाळीसगाव येथील असून ते १०वीला असतानाच लातूर येथे सन २००९ मध्ये सीमा सुरक्षा दलात भरती झाले. अवघे ११वर्षे सेवा झाली असताना क्रुर काळाने त्यांच्यावर  झडप घातली. त्यांना दोन मुली आहेत. एक पाच तर दुसरी दोन वर्षाची आहे. 

आमदार चिमणराव पाटील, नगराध्यक्ष रमेश परदेशी शंकर नगरात जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

एक दिवसाआड व्हिडीओ कॉल

राहूल पाटील हे एकदिवसाआड व्हिडीओ कॉल करून त्यांचा आई, थोरला भाऊ दिपक इतर नातेवाईकांशी सुध्दा संपर्क साधत होते. दि. ४ फेब्रुवारी २०२१ रोजी त्यांनी व्हिडीओ कॉल करून आपण परिवारासह पुढील महीन्यात येत असल्याचे कळविले होते. हे त्यांच्याशी झालेले शेवटचे संभाषण होते. 

भावपूर्ण श्रध्दांजली 

जवान राहूल पाटील यांच्या मृत्यूची वार्ता एरंडोल शहरात पसरली असता जय-हिंद चौक, म्हसावद नाका, हिंगलाज कॉलनी, बुधवार दरवाजा, धरणगाव चौफुली यासह अनेक ठिकाणी बँनर्स लावून त्यांना विविध नागरीक, संस्था व संघटनांतर्फे भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

टॅग्स :JalgaonजळगावBSFसीमा सुरक्षा दलErandolएरंडोलSoldierसैनिकDeathमृत्यू