शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
2
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
3
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
4
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
5
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
7
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
8
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
9
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
10
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
11
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
12
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
13
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
14
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
15
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
16
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
17
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
18
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
19
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
20
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

फुईचिरा, बोळावणलाही भारी माहेरची साडी पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 17:16 IST

पती, पुत्र व कन्या छत्र हरवलेल्या कळमडू, ता.चाळीसगाव येथील रेशमाबाई रामसिंग मरसाळे (वय ७०) या नात्याने वडिलांची बहीण (खानदेशी शब्द फुई, आत्या) असलेल्या वृद्धेला खेडगावातील मातंग समाजातील नेटारे कुटुंबातील त्यांच्या भाच्यांनी तिथे जात मायेचे छत्र धरत, आपल्या नात्याला जागल्याची अनुभूती दिली.

ठळक मुद्देनातीगोती हात देतीकळमडूच्या असहाय्य वृद्धेला खेडगावातून मायेची ऊब

संजय हिरे/कैलास अहिररावखेडगाव, ता.भडगाव/कळमडू, ता.चाळीसगाव : पती, पुत्र व कन्या छत्र हरवलेल्या कळमडू, ता.चाळीसगाव येथील रेशमाबाई रामसिंग मरसाळे (वय ७०) या नात्याने वडिलांची बहीण (खानदेशी शब्द फुई, आत्या) असलेल्या वृद्धेला खेडगावातील मातंग समाजातील नेटारे कुटुंबातील त्यांच्या भाच्यांनी तिथे जात मायेचे छत्र धरत, आपल्या नात्याला जागल्याची अनुभूती दिली.हा झाला तात्पुरता दिलेला हात किंवा आधार. वृद्ध, दोन्ही डोळ्यांनी न दिसणाऱ्या रेशमाबाईचे ऊर्वरित जीवन सुकर होणेकामी तिला कायमचा आधार किंवा तिचे अर्धवट घरकुलाचे हरवलेले छत्र मिळवून देण्याकामी ‘लोकमत’ हा सामाजिक विषय समाजमनापुढे ठेवत आहे.झाले असे, आपल्या जवळच्या नातेवाईकाच्या निधनाच्या निमित्तानं खेडगाव येथील राजेंद्र उर्फ अशोक युवराज नेटारे हे कळमडू येथून जात असताना, दारावरुन चाललो म्हणून आपल्या वृद्ध आत्याची ख्याली-खुशाली घेण्यासाठी तिला भेटून घेऊ या कारणाने आत्या रेशमाबाईच्या घराकडे वळले. तेथे गेल्यानंतर आत्याची भिकाºयासारखी अवस्था पाहून त्यांना उचंबळून आले. दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही. केसांच्या जटा क्षणभर भीती वाटावी अशा हातभर वाढलेल्या, महिनो-महिने अंगाला पाणी नसल्याने सुटलेली दुर्गंधी, तुटलेली खाट, तिला चिंध्या बांधून कशीबशी पेटी, विटावर ठेवत तिच्यावर अवघडलेल्या स्थितीत बसलेली. मंजूर घरकुलाच्या चार भिंतीच्या आड ते अपूर्णावस्थेत असल्याने डोक्यावर छत्र नाही. पत्ते खेळणाऱ्यांना कीव आली म्हणून उन्हाळ्यात तिच्यावर हिरवी नेट बांधली खरी, मात्र पावसाळा रेशमाआत्या पावसाच्या धारा अंगावर झेलत काढत होती. कुणीतरी जाड मेनकापड तिला गुंडाळलेले. ते गहीवरले. आत्याची विचारपूस करून तडक घरी आले.दुसºयाच दिवशी त्यांनी आपली काकू व मेहुणबारे येथे आरोग्यसेविका असलेल्या सुनंदाबाई छगन नेटारे, चुलतभाऊ शरद नेटारे यांना निरोप पाठवून कळमडू येथे बोलावून घेतले. पत्नी मीनाबाई, मुलगा गोपाळ व सुन मुक्ता यांना सोबत घेतले. बरोबर रिक्षातून एक खाट, ताडपत्री, एक साडी व जीवनावश्यक वस्तू घेत कळमडू येथे आले, आत्याची अंतिम सेवा होईल तेव्हा पण जिवंतपणीचा सेवा सोहळा अंगणात सुरू झाला. केसांच्या गुत्ता झालेल्या जटा भावजयी सुनंदाने कमी केल्या, नात सुन मुक्ताने चांगली घासून आंघोळ घातली. भाचा अशोक, शरद यांनी सोबत आणलेली माहेरची साडी नेसवली. आत्या खुलून निघाली. शेजारी-पाजारी गर्दी करून हा सेवा सोहळा पाहत नेटारे कुटुंबाला देव तुमचं भले करो, अशी दुवा देत होते. आजीला घरकुलाच्या चार भिंतीच्या आड नवीन खाट, अंथरुण टाकून बसवले. डोक्यावर छत्र नसल्याने सोबत आणलेली ताडपत्री दोन बांबूच्या साहाय्याने टांगली. आत्याशी चार गोष्टी, विचारपूस झाली. खेडगावी जावू, असा आग्रह धरला. आत्या मात्र माझ्या गावीच बरी. मला इथंच मरण येऊ देत. यावर ठाम. शेवटी आजूबाजूच्या आयाबहिणींना आत्याची काळजी घेण्याचे सांगून ते खेडगावी परतले.खान्देशात घरात विवाह सभारंभ असला म्हणजे बस्त्यात वडिलांच्या बहिणीला फुईचिरा काढला जातो किंवा तिच्या निधनानंतर शेवटची बोळावण घेतली जाते. अशा पद्धतीने आनंद व दु:ख या दोन्ही प्रसंगात या वस्राला एक माहेरचा मान म्हणून वाडवडिलांनी नात्याला जपणारी व्यवस्था भलेही करुन ठेवली असली तरी रेशमाबाईच्या भाच्यानी तिच्या जिवंतपणी केलेली तिची सेवा व तिला नेसवलेल्या माहेरच्या साडीने काही काळ का असेना तिला मायेची ऊब मिळाली असणार. फुईचिरा व बोळावणलाही ती पुरुन ऊरणारी आहे.शेजारधर्म निभावणाºया आयाबहिणींचे अन्नछत्ररेशमाबाईंना दोन मुले व एक मुलगी होती. ते वारले. नाही म्हटल्यास धाकटी सून व नातू आहेत. मात्र बाहेरगावी राहतात. जोवर अंगात बळ होत तोवर त्या दोन घरचे काम करत. जवळील पोहरे या गावी भाकर-तुकडा मागून भूक भागवली. डोळे अंध झाले. तशी त्यांनी खाट धरली. आजूबाजूला चर्मकार व दलित समाजाची घरे आहेत. त्या भगिनीच अन्न वाढतात. आपला शेजारधर्म निभावणाºया आया-बहिणींचे अन्नछत्र त्यांच्यासाठी जीवनदान ठरत आहे.वराहवतार रुपी अशीही सेवाजगाच्या पाठीवर सर्वकाही मिळेल, पण वृद्धापकाळी शरीर जर्जर झाल्यानंतर उडणारी घाण आवरण्यास पैसे देवूनही सेवा मिळत नाही. कुणी आवरत नाही, दोन्ही डोळ्यांनी अधू झालेली रेशमाबाई त्याला अपवाद नाही. परमेश्वराने मात्र त्यांच्यासाठी जणू काही व्यवस्था करुन ठेवलीय. त्या राहत असलेल्या चार भिंंतीआड एका कोप-यात एक झुडूप उगवले आहे. त्याच्याआडच त्यांचे शौचालय. सरकत-सरकत त्या आपला प्रात:र्विधी उरकतात. घरकुल दरवाजा नसल्याने सताड उघडे असते. त्यातून डुकरे आत येत आपले कर्तव्य पार पाडतात. यामुळे घाण होत नाही अन्यथा कल्पनाच करवत नाही अशी दुर्गंधी उठली असती.मामा अन् मावशा तसेच फुई (आत्या) अन् भाचा-भाची या नात्याला जपणारी नातेसंबंधाची विण कधीकाळी घट्ट होती. आजच्या काहीशा पुढारलेल्या समाजात ती ढिली झाल्याचे भलेही पहावयास मिळत असले तरी खेडगावच्या नेटारे कुटुंबाने या ऋणानुबंधाच्या गाठी सैल होऊ दिलेल्या नाहीत हाच एक दिलासा. 

टॅग्स :SocialसामाजिकBhadgaon भडगाव