लॉकडाऊन काळात जामनेरात मोफत रुग्ण तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 20:33 IST2020-04-03T20:32:46+5:302020-04-03T20:33:47+5:30
लॉकडाऊन कालावधीत काही खासगी रुग्णालय बंद असल्याने अडचणीची स्थिती असताना येथील डॉ.विजयानंद पाटील हे दररोज ४० ते ५० रुग्णांची मोफत तपासणी करीत आहेत.

लॉकडाऊन काळात जामनेरात मोफत रुग्ण तपासणी
ठळक मुद्देडॉ.विजयानंद पाटील यांचा स्तुत्य उपक्रमदररोज ४० ते ५० रुग्णांची होतेय तपासणी
जामनेर, जि.जळगाव : लॉकडाऊन कालावधीत काही खासगी रुग्णालय बंद असल्याने अडचणीची स्थिती असताना येथील डॉ.विजयानंद पाटील हे दररोज ४० ते ५० रुग्णांची मोफत तपासणी करीत आहेत.
लॉकडाऊन काळात गोरगरिबांना रोजगार मिळणे अवघड होत असल्याने आजारपणात उपचारासाठी पैशांची भासणारी चणचण लक्षात घेऊन १४ एप्रिलपर्यंत मोफत रुग्ण तपासणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या २८ मार्चपासून त्यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचा लाभ शहरातील गोरगरीब रुग्ण घेत आहेत.