चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथे मुलींना मोफत सायकल वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 18:51 IST2019-02-05T18:49:06+5:302019-02-05T18:51:09+5:30

चाळीसगाव , जि.जळगाव : तालुक्यातील वाघळी येथील कुंदनमल राका विद्यालयात जि.प. मानव विकास संसाधन विभागांतर्गत मुलींना मोफत सायकल वितरण ...

Free cycle delivery to girls at Waghali in Chalisgaon taluka | चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथे मुलींना मोफत सायकल वितरण

चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथे मुलींना मोफत सायकल वितरण

ठळक मुद्देविद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर दिसला आनंदमान्यवरांनी केले मार्गदर्शन

चाळीसगाव, जि.जळगाव : तालुक्यातील वाघळी येथील कुंदनमल राका विद्यालयात जि.प. मानव विकास संसाधन विभागांतर्गत मुलींना मोफत सायकल वितरण करण्यात आले.
प्रमुख पाहुणे जि.प.शिक्षण सभापती पोपट भोळे होते. आमदार उन्मेष पाटील अध्यक्षस्थानी होते. या वेळी पं.स. सभापती स्मितल बोरसे, दिनेश बोरसे, संजय पाटील, माया पाटील, विकास चौधरी, अरुण निकम, संजय देशमुख, संजय पाटील, अभय सोनवणे, दीपक पाटील, अविनाश सूर्यवंशी, सुभाष पाटील, योगेश पाटील होते. कार्यक्रमात उन्मेष पाटील, पोपट भोळे, अविनाश सूर्यवंशी, दिनेश बोरसे, अभय सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. याच कार्यक्रमात भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेतील निवड झालेल्या विद्यार्थ्यांनाही गौरविण्यात आले. भूगोल मार्गदर्शक शिक्षक पुरस्कार व्ही.व्ही.पाटील यांना देण्यात आला.
याच कार्यक्रमात आॅल इंडिया मेडिकल असोसिएशन अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयास चार प्रथमोपचार पेट्या भेट देण्यात आल्या. उपक्रम यशस्वितेसाठी मुख्याध्यापक अहिरे, पर्यवेक्षक भोसले तसेच शिक्षकांचे सहकार्य लाभले. आभार व्ही.व्ही.पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन डी.बी.महाजन यांनी केले.

Web Title: Free cycle delivery to girls at Waghali in Chalisgaon taluka