शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

इंग्रजी निवासी शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 5:03 PM

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याच्या हेतूने विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत शिक्षण देण्याची योजना राबविण्यात येत आहे़ त्यासाठी शाळांची निवड केली जाणार आहे़ त्यासोबतच विविध निकषांच्या आधारे शाळांचे गुणांकन केले जाणार आहेत़

ठळक मुद्देप्राप्त गुणानुसार मिळणार शाळांना विद्यार्थ्यांच्या प्रवेश शुल्काची रक्कमशाळांनी सोयी-सुविधा पुरविणे बंधनकारकमिळालेल्या गुणांनुसार मिळणार शासनातर्फे विद्यार्थ्यांचा मोबदला

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.२२ - अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याच्या हेतूने विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत शिक्षण देण्याची योजना राबविण्यात येत आहे़ त्यासाठी शाळांची निवड केली जाणार आहे़ त्यासोबतच विविध निकषांच्या आधारे शाळांचे गुणांकन केले जाणार आहेत़ त्याच गुणांकनानुसार शाळांची निवड करून विद्यार्थ्यांचा मोबदला निवासी इंग्रजी शाळांना दिला जाणार असल्याचे परिपत्रक आदिवासी विकास विभागातर्फे काढण्यात आले आहे़विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मागील काही वर्षातील घटना निदर्शनास आल्यामुळे नामांकित निवासी शाळांची निवड व गुणांकामध्ये सुधारणा करण्याची निर्णय राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाने घेतला आहे़ त्यामुळे इंग्रजी माध्यमांच्या शाळेची निवड करताना प्रचलित निकषामुळे गुणवत्तापूर्ण शाळांची निवड करण्यात येणार आहे़ त्यासाठी प्रस्ताव मागविण्यात येणार असून पात्र शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील़ तर सुविधा नसणाऱ्या शाळांना अपात्र ठरविण्यात येणार आहे़शाळांना मिळणार गुणनिकषांच्या आधारे शाळांचे गुणांकन केले जाणार आहे़ त्यानूसार ८० गुण मिळविणाºया शाळांना प्रति विद्यार्थी ७० हजार, ७० ते ७९ दरम्यान गुण मिळविणाºया शाळांना ६० हजार व ६० ते ६९ गुण मिळविणाºया शाळांना ५० हजार रूपये इतकी रक्कम शासनामार्फत दिली जाणार आहे़ ६० पेक्षा कमी गुणांकन झालेल्या शाळांचे प्रस्ताव अपात्र ठरविले जणार आहे़

टॅग्स :JalgaonजळगावStudentविद्यार्थी