जळगाव : तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहायक असल्याचे सांगत फसवणूक करणारा हितेश रमेश संघवी (४९) हा हॉटेलमध्ये थांबून त्याने अनेकांना गळाला लावले. वेटरला ५०० ते एक हजार रुपयांची टिप देऊन आपण उच्चपदस्थ अधिकारी असल्याची बतावणी तो करायचा. शिंदे यांच्या कार्यालयात स्वीय सहायक असल्याचे बनावट ओळखपत्र दाखवून हितेश संघवी व त्याची पत्नी अर्पिता यांनी १८ जणांची ५५ लाख ६० हजारची फसवणूक केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
...मी तर एकनाथ शिंदेंचा पीए; वेटरला द्यायचा एक हजाराची टीप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 11:52 IST