नोकरीसह कर्जाचे आमिष दाखवून पाच लाखात फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:19 IST2021-09-18T04:19:14+5:302021-09-18T04:19:14+5:30
जळगाव : एका फायनान्स कंपनीत नोकरीसह कंपनीकडून कर्ज देण्याचे आमिष दाखवत पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील जीवन कैलास बोढरे ...

नोकरीसह कर्जाचे आमिष दाखवून पाच लाखात फसवणूक
जळगाव : एका फायनान्स कंपनीत नोकरीसह कंपनीकडून कर्ज देण्याचे आमिष दाखवत पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील जीवन कैलास बोढरे या तरूणासह इतरांची ५ लाख २३ हजार ८१० रुपयांत फसवणुक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरुवारी सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
पिंपळगाव हरेश्वर येथील जीवन बोढरे यास १५ ते १६ सप्टेंबर दरम्यान वेगवेगळ्या नावाने अज्ञात इसमांनी संपर्क साधला. एका फायनान्स या कंपनीतून बोलत असून आपल्याला सेल्स मॅनेजर म्हणून नोकरी देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. नंतर जीवन यांच्याकडून इतरांना कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार जीवनसह इतरांचे कागदपत्रही त्यांनी मागविले. त्यासोबत लोन मिळण्यासाठी प्रोसेसिंग फी, डिक्लेरेशन चार्जेस, जीएसटी, स्टॅम्प फी, एनईएफटी चार्ज व बँक फी अशा वेगवेगळ्या कारणांसाठी ऑनलाईन ५ लाख २३ हजार ८१० रुपये स्विकारले. मात्र, अनेक दिवस होवूनही कुणालाही कर्ज न मिळाल्याने आपल्यासह इतरांची फसवणूक झाल्यानंतर गुरूवारी पिंपळगाव हरेश्वर येथील तरूणाने सायबर पोलीस ठाणे गाठले़ त्यानंतर तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे हे करीत आहेत.