मनमाड व श्रीरामपूरच्या पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:20 IST2021-08-13T04:20:56+5:302021-08-13T04:20:56+5:30
मनमाड व श्रीरामपूरच्या पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा चोपडा, जि. जळगाव: भुसार मालाच्या विक्रीत चोपड्यातील सहा व्यापाऱ्यांची तब्बल ...

मनमाड व श्रीरामपूरच्या पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
मनमाड व श्रीरामपूरच्या पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
चोपडा, जि. जळगाव: भुसार मालाच्या विक्रीत चोपड्यातील सहा व्यापाऱ्यांची तब्बल दोन कोटी १६ लाख रुपयात फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी मनमाडच्या तीन तर श्रीरामपूरच्या दोन अशा पाच व्यापाऱ्यांविरुद्ध चोपडा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेहमी विश्वासावर चालणाऱ्या गहू, मका, बाजरी व दादर या भुसार मालाच्या व्यवसायात व्यापाऱ्यांची २ कोटीपेक्षा जास्त रकमेची संगनमताने फसवणूक झाल्याची आजपर्यंतची सर्वात मोठी घटना आहे.
दिनेश कांतीलाल लुणावत, शुभम राजेंद्र लुणावत ( शुभम ट्रेडिंग कंपनी), सुमित राजेंद्र लुणावत (सुमित एजन्सी, तिघे रा. मनमाड) तसेच अमित कोठारी ( मे. घेवरचंद पन्नालाल कोठारी) व संगीता अमित कोठारी (कोठारी ट्रेडिंग कंपनी, दोघे रा. श्रीरामपूर) अशी या गुन्हा दाखल झालेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत.
चोपडा बाजार समितीमधील भुसार व्यापारी मगनलाल गोविंदराम अग्रवाल, शिवशंभू ट्रेडर्सचे अजय हरिश्चंद्र अग्रवाल, मे. अशोक मगनलाल अग्रवाल, माँ कालका पॉलिशर व क्लिनर्स एमआयसीचे अजय हरिश्चंद्र अग्रवाल, सौरभ ट्रेडर्सचे सतीश गोकूळ पाटील व मोरया ट्रेडर्स सौरभ सतीश पाटील यांच्याकडून मनमाड व श्रीरामपूर येथील व्यापाऱ्यांनी वेगवेगळ्या वेळी २ कोटी १६लाख रुपयांचा भुसार माल २ ऑगस्ट ते १० डिसेंबर २०२० या कालावधीत खरेदी केला. नंतर मालाचे पैसे देण्यात टाळाटाळ केली. सुनील मगनलाल अग्रवाल (५५ रा. अग्रसेन नगर, चोपडा) यांच्या फिर्यादीवरून मनमाड व श्रीरामपूर येथील पाच व्यापाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक अवतारसिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साबळे करीत आहेत.