शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

दीड वर्षात पूर्ण होणार जळगाव-चाळीसगाव रस्त्याचे चौपदरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2018 10:48 PM

जळगाव ते चाळीसगाव दरम्यानच्या चौपदरीकरणासाठी ४४७ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

ठळक मुद्देचौपदरीकणासाठी ४४७ कोटी रुपये मंजूरदोन टप्प्यात होणार जळगाव-चाळीसगावचे काम१८ महिन्यांची दिली रस्ते कामाची मुदत

जळगाव/पाचोरा- जळगाव ते चाळीसगाव दरम्यानच्या चौपदरीकरणासाठी ४४७ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. पहिल्या टप्प्यात जळगाव ते हिंगोणे व दुसऱ्या टप्प्यात हिंगोणे ते खडकी असे हे काम होणार आहे. अशोका बिल्डकॉमला हे काम देण्यात आले आहे. काम पूर्ण करण्यासाठी १८ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.जळगाव ते चांदवड असे हे काँक्रीटचे चौपदरीकरण होत आहे. हा राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्ग ७६३ जे मध्ये रुपांतरीत करण्यात आला आहे. हा रस्ता चौपदरीकरण करताना रस्त्यात काही गावांमधील घरे, मंदिरे अडचणीची ठरणार आहे. यासाठी नागरिकांंशी चर्चा करुन पुढील कार्यवाही करण्याच्या दृष्टीने स्वत: खासदार ए.टी. पाटील यांनी जळगाव ते रामदेववाडीपर्यंतच्या मार्गाची पाहणी केली तसेच नागरिकांशीही चर्चा केली. रामदेववाडी जवळ रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचीही काहीजागा ताब्यात घ्यावी लागणार आहे.१६ मंदिरांची पुनर्स्थापना, पुरातन मंदिराचीही अडचणरस्ता चौपदरीकरण करताना सुमारे १६ मंदिरांची पुनर्स्थापना करावी लागणार आहे. याचबरोबर पातोंडा जवळील पुरातत्व विभाग अंतर्गत येणारे मुदई देवीच्या मंदिराचीही भिंत येत असून या पाहणीसाठी औरंगाबाद येथील पुरातत्व विभागाचे अधिकारीही सोबत होते.यावर देखील योग्य तो मार्ग काढला जाणार आहे.अनेक पूल, भुयारी मार्ग आणि दोन टोलनाकेरस्त्यावर हिंगोणे येथे एक तर हडसन येथे एक असे दोन टोलनाके राहणार आहेत. गावांमधून रस्ता जात असल्याने वाढती वाहतूक लक्षात घेता अशा ठिकणी भुयारी मार्गही केले जाणार आहेत. १ मोठा पूल, १५ लहान पूल, काही मोºया, ३ जोड रस्ते अशी कामे होणार असून आवश्यकता भासल्यास नवीन डीपीआरही पाठविला जाणार आहे.

टॅग्स :highwayमहामार्गJalgaonजळगाव