चारचाकी चोरटा एलसीबीकडून जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 21:11 IST2020-12-02T21:11:31+5:302020-12-02T21:11:42+5:30
जळगाव : गुजरात राज्यातील उधना येथील चारचाकी चोरणाऱ्यास एलसीबीच्या पथकाने भुसावळ शहरातून अटक केली आहे. नितीन रामलाल राजपूत (३७, रा. ...

चारचाकी चोरटा एलसीबीकडून जेरबंद
जळगाव : गुजरात राज्यातील उधना येथील चारचाकी चोरणाऱ्यास एलसीबीच्या पथकाने भुसावळ शहरातून अटक केली आहे. नितीन रामलाल राजपूत (३७, रा. लोहारा, ता. पाचोरा) असे अटक केलेल्या चारचाकी चोरट्याचे नाव आहे.
भुसावळ शहरात विना क्रमांकाची चारचाकी वाहन घेवून एक तरूण संशयितरित्या फिरतअसल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी एलसीबीच्या पथकाने भुसावळ गाठत, त्या विना क्रमांकाच्या चारचाकीचा शोध घेतला. नंतर त्या तरूणाला ताब्यात घेतले असता, त्याने त्याचे नाव नितीन राजपूत सांगितले. तसेच ती कार गुजरात राज्यातील उधना येथून चोरी केल्याची त्याने कबुली दिली. पोलिसांनी चोरट्याला अटक केली असून कार देखील ताब्यात घेतली आहे. पुढील कारवाईसाठी चारचाकी चोरट्यास उधना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.