शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या विद्यार्थ्याने बनविली बॅटरीवर धावणारी चारचाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:12 IST

शेमळदे, ता. मुक्ताईनगर : येथील १६ वर्षाच्या अर्चन चिंतामण पाटील या मुलाने बॅटरीच्या सहाय्याने धावणारी चारचाकी गाडी बनवली आहे. ...

शेमळदे, ता. मुक्ताईनगर : येथील १६ वर्षाच्या अर्चन चिंतामण पाटील या मुलाने बॅटरीच्या सहाय्याने धावणारी चारचाकी गाडी बनवली आहे. विशेष म्हणजे ही गाडी बिनापेट्रोलने चालणारी आहे.

अर्चन पाटील हा मुक्ताईनगर येथील आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलचा १० वीचा विद्यार्थी असून लॉकडाऊनच्या काळात त्याने घरीच ही गाडी तयार केली आहे.

अशी तयार केली गाडी ...

लहानपणापासून त्याला विविध प्रकारच्या वस्तू बनवण्याची आवड आहे. त्याने मोबाइलवर व्हॉईस कमांड देऊन एक रोबोटसुद्धा तयार केला होता. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात घाटे विद्यालयात त्याने रोबोट तयार केला होता, त्यात त्याचा प्रथम क्रमांकसुद्धा आला होता. आताही चारचाकी त्याने सायकल विचारात घेत तयार केली आहे. गाडीला सायकलचेच चाकं वापरले असून या गाडीसाठी २४ वोल्टची एक बॅटरी ३५ एम्पिअर व ४५ एम्पिअरची त्याने वापरलेली आहे. ही बॅटरी साधारणतः ट्रॅक्टर किंवा कारमध्ये वापरली जाते. बॅटरी जोडणीचे नॉलेज त्याने घरच्या घरी यू ट्यूबवरून घेतले. सायकलचे ब्रेक तसेच मोटारसायकलचे एक्सिलेटर वापरण्यात आले आहे. तसेच ही गाडी गिअरच्या सहाय्याने पुढे व मागे करता येते. ताशी वीस किलोमीटर असा गाडीचा वेग आहे. अतिशय कमी खर्चामध्ये त्याने ही गाडी तयार केली आहे, त्यासाठी त्याला ३० हजार इतका खर्च आला आहे.

सोलर पॉवर कार तयार करणार

अर्चनला आता सोलर पॉवर कार तयार करायची असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. सोलर पॉवर कार तयार करण्यासाठी त्याने रिक्षाचे काही स्पेअर पार्ट तसेच डिफ्रेशन आणि कंट्रोलर याच्या सहाय्याने ही चार चाकी तयार करण्याचा संकल्प केला आहे त्यासाठी १२ होल्टच्या ४ बॅटरी तो त्यामध्ये वापरणार आहे तसेच मारुती कारचे चार चाके उपयोगात आणणार आहे. याचबरोबर दोन सोलर प्लेट ५० वॅटच्या लागणार आहे. यासाठी अंदाजे खर्च ५०ते ६० हजार रुपये लागणार असून त्यासाठी त्याचे वडील त्याला सर्वतोपरी मदत करीत आहे. सोलर पॉवर कारही चार क्विंटलपर्यंत वजन वाहून नेऊ शकणार आहे. एकदा बॅटरी चार्ज केली की ही गाडी वेगाने जाऊ शकते .

लहानपणापासूनच गाडी बनवण्याची आवड असलेल्या अर्चनचे वडील ऐनपूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आरोग्य सेवक आहेत, एका लहानशा गावातील जवळपास साडेतीन ते चार हजार लोकसंख्या असलेल्या शेमळदे गावातील हा मुलगा दररोज शिक्षणासाठी मुक्ताईनगर येथे ये जा करीत असतो. सध्या शाळा बंद आहेत. या काळातही तो विविध प्रयोग करीत आहे. सॉफ्टवेअर ऑटोमोबाइल इंजिनिअर होण्याचे त्याचे स्वप्न असून पुढील शिक्षणासाठी त्याला मुंबई किंवा पुणे या ठिकाणी जायचे आहे. आपल्या देशासाठी काहीतरी आविष्कार करण्याची त्याची इच्छा आहे. सध्या सोशल मीडियावर त्याने बनवलेली कार खूप व्हायरल होत आहे. आज या महागाईच्या काळात पेट्रोल व डिझेलचे भाव गगनाला भिडलेले असल्यामुळे एक लहानग्या चिमुकल्याचा हा आविष्कार खूप महत्त्वाचा मानला जात आहे.