चोपडा तालुक्यात चार गावठी पिस्तुल,दहा जिवंत काडतूस जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 22:28 IST2017-12-20T22:23:08+5:302017-12-20T22:28:11+5:30
अहमदनगरच्या तीन जणांना अटक, कार जप्त

चोपडा तालुक्यात चार गावठी पिस्तुल,दहा जिवंत काडतूस जप्त
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.२० : चोपडा तालुक्यातील वैजापूर गावाजवळ चार गावठी पिस्तुल व दहा जिवंत काडतूसासह अहमदनगर जिल्ह्यातील तीन जणांना अटक करण्यात आली. बुधवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली.
सचिन वसंत कोळेकर (रा.मुक्तापूर,नेवासा जि.अहमदनगर), अक्षय बाळासाहेब देशमुख (रा.राहुरी, जि.अहमदनगर) व देवानंद भालचंद्र मकासरे (रा.राहुरी, जि.अहमदनगर) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडील कार (क्र.एम.एच.१७ बी.डी.५७४९) जप्त करण्यात आली आहे. हे तीनही जण मंगळवारी रात्री तीन वाजता उमर्टी गावात आले होते. बुधवारी सकाळी दहा वाजता त्यांना वैजापूर गावाजवळ पोलिसांनी पकडले.
बंदोबस्त सोडून धावले पोलीस
राज्यपाल सी.विद्यासागर राव हे जळगाव दौºयावर असल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तावर होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना गावठी पिस्तुलची माहिती मिळाली. यानंतर चोपडा तालुक्यात जाऊन ही कारवाई करण्यात आली.
ैवैजापूर येथून पिस्तुल घेतल्यानंतर नगर जिल्ह्यात दरोडा टाकण्याचे त्यांचे नियोजन होते, असे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनी दिली.