शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

कन्नड घाटात भीषण अपघातात, मालेगावचे चार जण ठार, ७ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 10:01 IST

अक्कलकोट येथून परतणा-या भाविकांवर काळाची झडप

- जिजाबराव वाघ

चाळीसगाव (जि.जळगाव) : कन्नड घाटात रविवारी रात्री १२ वाजता अक्कलकोट येथून देवदर्शन करुन परतणा-या जानेवाडी ता. मालेगाव येथील भाविकांच्या खासगी वाहनाला गंभीर अपघात झाला. वाहन हे खोल दरीत कोसळल्याने चार जण ठार तर ७ जखमी झाले आहेत.

 अपघातातून बचावलेल्या मुलाने प्रसंगावधान राखत घटनेची माहिती दिल्यानेच रात्री १  वाजता आमदार मंगेश चव्हाण यांच्या टीमसह महामार्ग, ग्रामीण व शहर पोलिसांसोबतच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघाग्रास्तांना खोल दरीतून वर काढले. रात्री घाटात प्रचंड धुके होते. पाऊसही असल्याने मदत कार्यात अडथळा निर्माण झाला.

पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तीन ते चार पथके तयार करुन जखमींना मदत केली गेली. अपघातात पती - पत्नीसह लहान मुलगी मृत झाली आहे. सोमवारी सकाळपासून घाट परिसरात पाऊस सुरु आहे.

असा झाला अपघातःजानेवाडी ता.मालेगाव येथील काही भाविक खासगी वाहनाने गाडी क्र. एमएच ४१ व्ही ४८१६ ने अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी गेले होते. ते औरंगाबादहून कन्नडघाटमार्गे चाळीसगावकडे येत असतांना घाटमार्ग संपण्याच्या एक किमी अगोदर हा अपघात घडला. गाडीचा चालक अभय पोपटराव जैन (वय ५०) हा काचेवर धुक्यामुळे आलेली वाफ कापडाने पुसत असतांनाच त्याचे गाडीवर नियंत्रण सुटले. यामुळे गाडी थेट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. रविवारी घाटात पाऊस व वादळीवा-यासह धुकेही होते. काही ठिकाणी दरडीही कोसळल्या आहेत. पोलिसांनी घाटात वाहने सावकाश व सावधानतेने चालविण्याचे आवाहन केले आहे.

अपघातील मृतःप्रकाश गुलाबराव शिर्के (वय -६५), शिलाबाई प्रकाश शिर्के (वय -६०), वैशाली धर्मेंद्र सुर्यवंशी (वय -३५), पूर्वा गणेश देशमुख (वय-८ )अपघातातील जखमीः अनुज धर्मेंद्र सुर्यवंशी (वय - २०),जयेश धर्मेंद्र सुर्यवंशी (वय १७), सिध्देश पुरुषोत्तम पवार (वय १२), कृष्णा वासुदेव शिर्के (वय - ४), रुपाली गणेश देशमुख (वय - ३०), पुष्पा पुरूषोत्तम पवार (वय ३५ ).

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव