‘सर्वोदय’साठी नव्याने चार अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 23:09 IST2021-04-01T23:09:17+5:302021-04-01T23:09:33+5:30

सर्वोदय शैक्षणिक संस्थेच्या निवडणुकीसाठी २७ ते ३१ दरम्यान चार इच्छुकांनी अर्ज दाखल केले.

Four new applications have been filed for Sarvodaya | ‘सर्वोदय’साठी नव्याने चार अर्ज दाखल

‘सर्वोदय’साठी नव्याने चार अर्ज दाखल

ठळक मुद्देछाननीत चारही अर्ज वैध.

लोकमत न्यूज नेटवर्क

चाळीसगाव : उंबरखेडेस्थित सर्वोदय शैक्षणिक संस्थेच्या निवडणुकीसाठी नव्याने कार्यक्रम जाहीर झाला असून २७ ते ३१ दरम्यान चार इच्छुकांनी अर्ज दाखल केले. गुरुवारी झालेल्या छाननीत चारही अर्ज वैध ठरविण्यात आले आहे.

सर्वोदय शिक्षण संस्थेच्या निवडणुकीसाठी प्रचार सुरु असतांनाच उमेदवार सुपडू मांगो महाजन यांचा मृत्यू झाल्याने निवडणुक स्थगित करण्यात आली होती. यानंतर नव्याने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. यात यापूर्वी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्याऐवजी नविन इच्छुकांना अर्ज दाखल करता येणार होते. 

यासाठी २७ ते ३१ असा पाच दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. यात सर्वसाधारण गटातून चार जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. गुरुवारी दाखल अर्जांची छाननी झाली. यात चारही अर्ज वैध ठरविण्यात आले.

Web Title: Four new applications have been filed for Sarvodaya