इंग्रजी शाळांच्या आरटीई प्रतिपूर्तीसाठी पावणेचार कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 20:51 IST2019-11-16T20:51:21+5:302019-11-16T20:51:32+5:30
मेस्टाचा मागणीला यश : लवकरच निधीचे होणार वितरण

इंग्रजी शाळांच्या आरटीई प्रतिपूर्तीसाठी पावणेचार कोटी
जळगाव- इंग्रजी शाळांच्या आरटीई प्रतिपूर्तीसाठी शासनाकडून पावणेचार कोटींची तरतूद मान्य करण्यात आली असून मेस्टाच्या पाठपुराव्याला यश आल्याची माहिती मेस्टाचे नरेश चौधरी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे़ दरम्यान, नोव्हेंबरचा शासन निर्णय जिल्हा परिषदेला प्राप्त झाले असल्याचेही त्यात म्हटले आहे़
शासनाकडे इंग्रजी शाळांच्या आरटीई प्रतिपूर्तीची मोठी रक्कम शासनाकडे प्रलंबित होती़ त्यामुळे मेस्टा संघटनेकडून जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाला निवेदन देवून प्रलंबित प्रतिपूर्तीची मागणी करण्यात आली होती़ तसेच पाठपुरावाही करण्यात आला़ त्या मागणीला यश झाले असून पावणे चार कोटीची तरतूद करण्यात आली आहे़
दरम्यान, सन २०१८-१९ मध्ये आरटीई प्रवेशित विद्यार्थ्यांचा निधी जिल्हा परिषद ला प्राप्त झाला आहे़ मात्र, निधी जिल्ह्यातील सर्व इंग्रजी माध्यमांच्या शाळांना त्वरित वितरित करण्यात यावा, अशा मागणीचे नुकतेच निवेदन मेस्टा संघटनेकडून देण्यात आले आहे़ यावेळी संघटनेचे नरेश चौधरी, विद्यात पाटील, एनक़े़पवार, सुनील पाटील आदींची उपस्थिती होती़ मागणी लवकर मान्य न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संघटनेकडून देण्यात आला आहे़