चाळीसगावी संस्कार भारतीतर्फे ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 20:05 IST2019-10-25T20:00:22+5:302019-10-25T20:05:38+5:30

दिवाळी प्रकाश पर्वानिमित्ताने संस्कार भारतीच्या वतीने येथे 'दिवाळी पहाट ' हा कार्यक्रम स्थानिक कलाकारांच्या शास्त्रीय गायनाने व भावगीतांनी झाली.

Forty-eightth annual 'Diwali dawn' program by India | चाळीसगावी संस्कार भारतीतर्फे ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम

चाळीसगावी संस्कार भारतीतर्फे ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम

ठळक मुद्दे'दिवाळी पहाट ' समधूर शास्त्रीय गीतांनी व संगिताने गंधाळलीसुरेल गीते सादर करून प्रेक्षकांची दाद

चाळीसगाव, जि.जळगाव : दिवाळी प्रकाश पर्वानिमित्ताने संस्कार भारतीच्या वतीने २५ रोजी रोजी सकाळी साडेसहाला विठ्ठल मंदिर (फाडीचे)  येथे 'दिवाळी पहाट ' हा कार्यक्रम स्थानिक कलाकारांच्या शास्त्रीय गायनाने व भावगीतांनी झाली.
कार्यक्रमाची सुरुवात मंदिराचे पुजारी पाठक गुरुजी यांनी श्री विठ्ठल रखुमाईचे पूजन करून केली. यावेळी अध्यक्ष गितेश कोटस्थाने, सचिव विवेक घाटे, देवगीरी प्रांत नाट्य विभागप्रमुख सुनीता घाटे व संगीत विभागप्रमुख शंकर पाठक यांच्या उपस्थितीत पूजन करण्यात आले.
यावेळी श्रावणी कोटस्थाने, आशुतोष खैरनार, स्वरा कोटस्थाने, शुभांगी संन्यासी, राजाभाऊ कुळकर्णी, विकास चव्हाण, सुहासिनी पाठक यांनी सुरेल गीते सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली. यावेळी स्वर संवादिनीची साथ शंकर पाठक यांनी, तर तबल्याची साथ अजिंक्य त्रिभुवन यांनी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र देशपांडे यांनी, तर आभार विवेक घाटे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिलीप संन्यासी, प्रकाश कुळकर्णी, शालिग्राम निकम, रमेश पोतदार, आधार महाले, बाळासाहेब सापनर, अजित कासार, मनीषा देशपांडे, रत्नप्रभा नेरकर यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमासाठी म. सो.बाविस्कर, डॉ.हेमांगी पूर्णपात्रे, चंद्रशेखर उपासनी, राजेंद्र चिमणपुरे, विश्वास देशपांडे, चंद्रकांत ठोंबरे, तुषार मुजूमदार, मिलिद देव, मधुकर कासार, मोडक, वैभव भंडारी, खराडे, भालचंद्र दाभाडे, प्रसाद पाठक, अरुण जाधव, निर्मला पवार उपस्थित होते.

Web Title: Forty-eightth annual 'Diwali dawn' program by India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.